ठळक मुद्देभात पिकावर 'हळदी रोग' आणि 'चायनीज व्हायरस'चा प्रादुर्भावपूरग्रस्त पंजाबमधील शेतकऱ्यांवर आणखी एक संकटया रोगांमुळे पीक उत्पादन घटण्याची शक्यता.Paddy Farmers : पंजाबमधील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीनंतर आता आणखी एक संकट आले आहे. पंजाबमध्ये सध्या भात पीक परिपक्व होण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. पण पुरामुळे आधीच बाधित झालेले शेतकरी दोन मोठ्या धोक्यांचा सामना करत आहेत. ते म्हणजे भात पिकावरील 'हळदी रोग' आणि 'चायनीज व्हायरस'चा प्रादुर्भाव..चायनीज व्हायरस काय आहे?‘चायनीज व्हायरस’ला सदर्न राइस ब्लॅक-स्ट्रिक्ड ड्वार्फ व्हायरस म्हणून ओळखले जाते. हा पहिल्यांदा २००१ मध्ये दक्षिण चीनमध्ये आढळला होता. म्हणून त्याला सदर्न राइस ब्लॅक-स्ट्रिक्ड ड्वार्फ व्हायरस म्हटले जाते. या व्हायरसमुळे भाताचे पीक काळे पडते. या व्हायरसमुळे पंजाबसह हरियाणा सरकार सतर्क झाले आहे..Punjab Floods: बुडता पंजाब.या व्हायरसमुळे पंजाबमधील सुमारे ११ हजार एकर क्षेत्रावरील भात पीक प्रभावित झाले आहे. यात बहुतांश पटियाला येथील ७ हजार आणि फतेहगढ साहिब जिल्ह्यातील येथील ३,५०० एकर क्षेत्राचा समावेश आहे..हा व्हायरस व्हाईट-बॅक्ड प्लांट हॉपर नावाच्या एका रोग वाहकाच्या माध्यमातून पसरतो. हा भाताच्या रोपांचा रस शोषून घेतो आणि संक्रमित रोपांपासून निरोगी रोपांमध्ये व्हायरसचा फैलाव करतो. म्हणजे हा व्हायरस भात रोपांची वाढ रोखतो. परिणामी उत्पादन घटत असल्याचे तज्ञ्ज सांगतात..हरियाणामध्येही भात लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. येथे उत्पादन घेतल्या जाणाऱ्या बासमतीची जगभरात एक वेगळी वेगळी आहे. याआधी हरियाणा विधानसभेत भात पिकावरील चायनीज व्हायरसच्या प्रादुर्भावाचा मुद्दा उपस्थित केला होता. कृषी मंत्री श्याम सिंह राणा यांनी सांगितले होते की, या व्हायरसमुळे राज्यातील ४० लाख एकर भात क्षेत्रापैकी सुमारे ९२ हजार एकर क्षेत्र प्रभावित झाले आहे..GM Maize Variety: पंजाब कृषी विद्यापीठात जीएम मक्याच्या चाचण्या.हळदी रोगाचा प्रादुर्भावपंजाबमधील शेतकऱ्यांना भात पिकावर हळदी (फॉल्स स्मट) या बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून आले आहे. याला रिचमेन्स रोगदेखील म्हटले जाते. हा रोग जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये आढळून आला आहे. पण काही जिल्ह्यांतील केवळ दोन एकरांवरच याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तर काही ठिकाणी हा अधिक पीक क्षेत्रावर दिसून आला आहे..हा रोग सामान्यतः फुलोरा अवस्थेत हल्ला करतो. यामुळे लोंबीतील दाण्यांवर हळदीसारख्या पिवळ्या रंगाच्या पावडरसारखे गोळे दिसून येतात. म्हणूनच या हळदी रोग असे नाव पडले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.