Pune ZP Housing Approvals: पुणे जिल्हा परिषदेकडून आठवड्यात ३२ हजार घरकुलांना मंजुरी

PM Housing Scheme: पंतप्रधान घरकुल योजनेसाठी पुणे जिल्ह्याला यावर्षी ३८ हजार ८२७ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले. एका आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ३२ हजार ११८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
Housing Scheme
Housing SchemeAgrowon
Published on
Updated on

Pune News: पंतप्रधान घरकुल योजनेसाठी पुणे जिल्ह्याला यावर्षी ३८ हजार ८२७ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले. एका आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ३२ हजार ११८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत कामांना वेग आला आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकाला पक्के घर मिळण्यासाठी पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यात घरकुले मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या ही इंदापूर तालुक्यात चार हजार ७०० एवढी आहे. तर जुन्नरमध्ये चार हजार १४४ एवढ्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत.

Housing Scheme
MHADA Housing Board : सामान्यांच्या गृह स्वप्नपूर्तीला म्हाडाचे बळ: संजीव जयस्वाल

बारामतीत तीन हजार ४०२ घरकुले तर सर्वांत कमी मुळशी तालुक्यात ७३४ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. अद्याप सहा हजार ७०५ घरकुले मंजूर करणे शिल्लक आहे. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड दिले नसलेल्या नागरिकांचे अर्ज प्रलंबित आहेत.

Housing Scheme
Pune Housing Project: पुणे विभागात असणार वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट

याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू म्हणाल्या, ‘‘मंजुरी शिल्लक असलेल्या नागरिकांनी आधार कार्ड बँकेला संलग्न करावेत. स्वतःची जागा उपलब्ध असल्याची कागदपत्रे ग्रामपंचायत किवा पंचायत समितीमध्ये द्यावीत. त्यानंतर तत्काळ पुढील काही दिवसांत घरकुल मंजूर केले जाईल. लाभार्थ्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये.’’

पंतप्रधान घरकुल योजना टप्पा दोनमध्ये मंजूर केलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना माहिती समजण्यास मदत होईल. सध्या मंजुरी मिळालेल्या घरकुलांचे लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू करावे.
गजानन पाटील, प्रशासक, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com