Pune Tourism: पुणे जिल्ह्याचा समग्र पर्यटन आराखडा तयार करा

Collector Jitendra Dudi: पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिकस्थळे, सांस्कृतिक, क्रीडा, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी, वन, जल पर्यटन, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण, परिपयर्टन, ग्रासलँड सफारी आदीबाबींचा सर्वसमावेशक पर्यावरणपूरक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
Collector Jitendra Dudi
Collector Jitendra DudiAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ले, धार्मिकस्थळे, सांस्कृतिक, क्रीडा, नद्या, वन्यजीव, जैवविविधता, धरणे, कृषी, वन, जल पर्यटन, साहसी खेळ, पक्षी निरीक्षण, परिपयर्टन, ग्रासलँड सफारी आदीबाबींचा सर्वसमावेशक पर्यावरणपूरक ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. पर्यटन आराखडा तयार करताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासह अत्याधुनिक साधनांचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखडा’ निर्मितीच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी उपवनसरंक्षक महादेव मोहिते, अमोल सातपुते, पर्यटन संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक उपसंचालक शमा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, पाटंबधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, श्‍वेता कुऱ्हाडे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

Collector Jitendra Dudi
Development Fund : विकासकामांसाठी भरीव निधी देणार; पालकमंत्री नाईक

श्री. डूडी म्हणाले, की जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अमूल्य कार्याची ओळख करून देणारे गडकिल्ले आहेत, या गडकिल्ल्यांकडे देश-विदेशातील पर्यटक आकर्षित करण्याच्या दृष्टीने कामे करावीत. यामध्ये पयर्टकांना आकर्षित करण्यासोबत महसुलात वाढ, स्थानिकांना रोजगार, स्थानिक लोकपरंपरा, साहित्य, कला, संगीत, नाट्य आदी बाबींचा प्रामुख्याने विचार करून पर्यटन स्थळांची निवड करण्यात यावी. पर्यटनस्थळावर स्वच्छता राहण्यासोबतच प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याबाबत कटाक्षाने दक्षता बाळगावी.

पर्यटनस्थळांची व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासोबतच पर्यटकांना पर्यटक मागर्दशक, रस्ते, दिशादर्शक फलके, भोजनालय, निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था, दरपत्रके, वैद्यकीय सुविधा आदीबाबत सर्वंकष माहिती ऑनलाइन स्वरूपात मिळणे आवश्यक आहे. याकरिता नामांकित पर्यटक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

Collector Jitendra Dudi
Tribal Development : आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर होणे गरजेचे

नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन करा

येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात पर्यटन महोत्सव आयोजित करण्याबाबत नियोजन करावे, त्यादृष्टीने प्रथम ठिकाण निश्चित करावे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक, पर्यटन क्षेत्राशी निगडित विविध सामाजिक संस्था आदींनाही निमंत्रित करावे. या दृष्टीने पुणे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिंगकरिता ‘पुणे जिल्हा समग्र पर्यटन आराखड्याची निर्मिती महत्त्वाची ठरणार आहे. याअनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.

जुन्नर पर्यटन आराखडा गुलदस्तात

राज्य शासनाने जुन्नर तालुक्याला २०२४ मध्ये पर्यटनाचा दर्जा दिला आहे. मात्र अद्याप यावर कोणताही कार्यवाही आणि निधीची तरतूद झालेली नाही. माजी आमदार अतुल बेनके यांच्या पुढाकाराने पर्यटन विकासाचा आराखडा जिल्हा नियोजन समितीद्वारे करण्याचे काम विधानभानिवडणुकी आधी हाती घेण्यात आले होते. त्या डीपीआरचे सादरीकरण अर्थमंत्री अजित पवार यांना देखील झाले होते. मात्र अद्याप या डिपीआरला गती मिळालेली नसून, डिपीआर गुलदस्तात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com