Primary School Development: पुणे जिल्ह्यातील ३०३ प्राथमिक शाळा होणार विकसित

Educational Transformation: पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ३०३ प्राथमिक शाळा पुणे मॉडेल स्कूल १०८ प्राथमिक आरोग्य केंद्र पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रकल्प आखण्यात आला आहे
ZP Primary School
ZP Primary SchoolAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील ३०३ प्राथमिक शाळा पुणे मॉडेल स्कूल १०८ प्राथमिक आरोग्य केंद्र पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रकल्प आखण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात येणाऱ्या शाळा व आरोग्य केंद्र वा सर्व सुविधांनी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत, यामध्ये उत्तम दर्जाच्या इमारतींसह कर्मचारी वगांसाठी निवासस्थानाचीही व्यवस्था करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पुणे महिला स्कूलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्य करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

ZP Primary School
School Education Department : राज्यात होणार १५ हजार शिक्षकांची भरती; शालेय शिक्षण विभागाकडून सरकारला प्रस्ताव

तसेच, पुणे महिला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही उपचारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक मुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबरोबरच जिल्हा परिषदेच्या वतीने साठ अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाला व कार्यक्षेत्रातील अनेक बंधाऱ्यांच्या दुरुस्तीलाही मान्यता देण्यात आली.

ZP Primary School
ZP School : ‘झेडपी’च्या ३९४ प्राथमिक शाळांत लवकरच सीसीटीव्ही

आधुनिकतेकडे वाटचाल

पुणे जिल्हा परिषदेने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू करत टपाल व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेसाठी ‘ई-टपाल प्रणाली’ सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या टपालाची सद्यःस्थिती तसेच ते टपाल कोणत्या विभागाकडे पाठवण्यात आले आहे, याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुणे मॉडेल स्कूल व पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हे प्रकल्प नक्कीच यशस्वी होतील व संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील ५ वर्षांसाठी दरवर्षी ३०३ शाळा निर्माण करण्यात येणार आहेत.
गजानन पाटील, सीईओ, पुणे जिल्हा परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com