Tourism Opportunity: ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२७’च्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला सामूहिक पाठिंबा मिळत आहे. राजगड (वेल्हे), भोर आणि मुळशी तालुक्यांतील एकूण ३९ ग्रामपंचायतींची आभारपत्रे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना पाठविले आहे. यामध्ये राजगड (१६) भोर (७) आणि मुळशी (१६) ग्रामपंचायतींचा समावेश आहे. .२६ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणाऱ्या पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग आंतरराष्ट्रीय सायकलिंगच्या नकाशावर पुन्हा झळकणार आहे. पहिल्या पर्वानंतर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाची २.१ श्रेणी मिळाली आहे. जगभरातील व्यावसायिक सायकलपटू जिल्ह्यातील रस्त्यांवरून मार्गक्रमण करणार असल्याने या परिसरातील रस्ते, निसर्ग, वारसा आणि ग्रामीण जीवनशैलीला जागतिक स्तरावर मान्यता मिळणार आहे..Maharashtra Agri Tourism: राज्यात कृषी पर्यटनाला मिळणार चालना.स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मानकानुसार विकसित आणि दर्जोन्नत करण्यात आलेल्या रस्त्यांचा लाभ स्पर्धेच्या दिवसांपुरता मर्यादित राहणार नाही. गावांना शहरांशी जोडणारी वाहतूक अधिक सुलभ झाल्याने शेतीमाल बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे, स्थानिक उत्पादने ग्राहकांपर्यंत नेणे आणि ग्रामीण भागातील व्यवसायांना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे शक्य होईल..छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने आणि देदीप्यमान कारकिर्दीने पुनीत झालेला राजगडचा ऐतिहासिक वारसा, सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य आणि ग्रामीण संस्कृती स्पर्धेच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. यामुळे या भागाविषयी पर्यटनाची उत्सुकता वाढण्यास आणि स्थानिक पर्यटन, निवास, खाद्यपदार्थ, मार्गदर्शन तसेच इतर सेवांशी संबंधित व्यवसायांना नव्या संधी मिळण्यास मदत होईल. कृषिपूरक व्यवसाय आणि स्थानिक उत्पादनांची ओळख वाढवण्याची संधीही निर्माण होऊ शकते..Mahendri Agro Tourism : कृषी पर्यटनात मानाचा तुरा! सीमेवरील 'महेंद्री ॲग्रो टुरिझम'ला जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर.भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर हरमण मांडेकर यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून या उपक्रमाचे कौतुक केले आहे. स्पर्धेमुळे पायाभूत सुविधांचा विकास, पर्यटनवृद्धी आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण जगदाळे यांनी देखील या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आहेत..जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन स्पर्धेच्या आयोजनाची तयारी करत आहे. ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून मिळणारा सामूहिक प्रतिसाद हा पुणे ग्रँड टूरचे लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.