Pulse Farmer Relief: तूर व हरभऱ्याला खुल्या बाजारात समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले असताना, नाफेडकडून दिल्या जाणाऱ्या हमीभावामुळे कडधान्य उत्पादकांना दिलासा मिळत आहे. पडत्या दराच्या पार्श्वभूमीवर नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांसाठी आधार ठरत असल्याचे चित्र आहे..हंगामाच्या सुरुवातीला तुरीला प्रति क्विंटल सुमारे ९,००० रुपये दर मिळत होता. मात्र, हंगामा अखेर काढणी, मळणीनंतर बाजारात आवक वाढताच तुरीच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. सुमारे ७,००० रुपयांपर्यंत तुरीचे दर खाली आले. दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अशा परिस्थितीत नाफेडकडून प्रतिक्विंटल ८,००० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला शेतमाल विक्रीवर भर दिला आहे. .Onion Crisis: एकरी लाखाचा खर्च; हातात ६३ हजार.राळेगाव येथील खरेदी-विक्री संघाकडे आतापर्यंत सुमारे ३५० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. त्यापैकी १४१ शेतकऱ्यांकडून २,०३६ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून, उर्वरित शेतकऱ्यांचा मालही टप्प्याटप्प्याने खरेदी केला जाणार आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर बारदाण्याची कोणतीही अडचण नसून विक्री केलेल्या तुरीचे पैसे ८ ते १० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याची माहिती देण्यात आली..‘खुल्या बाजारात दर घसरल्याने मोठे नुकसान होत होते. नाफेडकडून ८ हजार रुपये दर मिळत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला,’ अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने या पार्श्वभूमीवर व्यक्त केली..Paddy Payments Received: धान चुकाऱ्यांसाठी २१८ कोटींचा निधी प्राप्त.नाफेडच्या नियमानुसार विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली खरेदी-विक्री संघामार्फत ही खरेदी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत सभापती मिलिंद इंगोले व व्यवस्थापक संजय जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सहभागी झाले आहेत..दरम्यान, हरभऱ्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. खुल्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल सुमारे ५,००० रुपये दर मिळत असताना, नाफेडकडून ५,८७५ रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे हरभऱ्यासाठीही शेतकरी नोंदणी करत असून, येत्या काही दिवसांत खरेदी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले..‘खुल्या बाजारातील दराच्या तुलनेत नाफेडचा दर अधिक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे,’ असे मत स्थानिक व्यापाऱ्यांनी याविषयी बोलताना व्यक्त केले..एकूणच, कडधान्यांच्या घसरत्यादरामुळे निर्माण झालेल्या संकटात नाफेड शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरत असून, हमीभावाच्या माध्यमातून काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य मिळत असल्याचे दिसून येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.