Crop Damage : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

Unseasonal Rain : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मागील दिड ते दोन महिन्यांत सुमारे २७ हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मागील दिड ते दोन महिन्यांत सुमारे २७ हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची अजूनही मदत मिळाली नसल्याने नगर जिल्ह्यात शेतकरी हतबल आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे.

संभाजी दहातोंडे यांनी सांगितले, की नगर जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. गतवर्षी खरिपाच्या शेवटी अति पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले होते.

त्या नुकसानातून सावरत नसताना पुन्हा उन्हाळ्यात मोठा फटका बसला, शेतमालाला दर नाहीत, त्यात निसर्गाने मारल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यंदा एप्रिलमध्ये सुमारे ४७ हजार शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Damage Compensation
Prahar Sanghatana : नुकसान भरपाईसाठी ‘प्रहार’ करणार आंदोलन

नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री व अन्य नेत्यांनी पाहणी केली. त्यावेळी आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात दोन महिन्यानंतरही मदत नाही.

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे असताना अजून एकही रुपयाची मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची सरकारकडून हेळसाड होत आहे. पालकमंत्री, प्रशासनातले अधिकारी केवळ अश्वासने देत आहेत. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यात एका महिन्यात यंदाच्या उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने नगर तालुक्यातील ५३ गावांत १ हजार ४४२ हेक्टर, पारनेरमध्ये २५ गावांत ३ हजार १९४ हेक्टर, पाथर्डी तालुक्यात ४ गावांत १४९ हेक्टर, कर्जतमध्ये सात गावांत १०८ हेक्टर, श्रीगोंद्यात १६ गावांत १ हजार २६८ हेक्टर, जामखेडमध्ये २१ गावांत ५५ हेक्टर, राहुरीत सात गावांत ४८१ हेक्टर, नेवाशात १२८ गावांत १३ हजार हेक्टर पेक्षा अधिक नुकसान, शेवगावमध्ये २७ गावांत ५ हजार हेक्टर, संगमनेरमध्ये २१ गावांत ११ हेक्टर, कोपरगावातील १० गावांत २१५, अकोल्यात १६ गावांत ६५१ आणि राहाता तालुक्यात ८ गावांत २७३ हेक्टर नुकसान झाले आहे.

‘अनुदान लवकर न मिळाल्यास आंदोलन’

या लोकांना मदत कधी मिळणार की शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा फायदा घेणार असा प्रश्न संभाजी दहातोंडे यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्याला अनुदान लवकर मिळाले नाही तर आंदोलन करण्या.चा इशाराही त्यांनी दिला आहे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com