Farmer Protest : शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन

Farmer Distress in Maharashtra : गेल्या काही महिन्यांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ ला पहिली शेतकरी आत्महत्या केली होती. तेव्हापासून सुरू असलेले चक्र थांबलेले नाही.
Farmer Death
Farmer Death Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Akola News : गेल्या काही महिन्यांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ ला पहिली शेतकरी आत्महत्या केली होती. तेव्हापासून सुरू असलेले चक्र थांबलेले नाही. गेल्या दोन दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली.

या वेदनादायी घटना याबाबत ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता.१९) ठिकठिकाणी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. याविषयी माहिती विविध संघटनांनी दिली आहे.

Farmer Death
Delhi Farmers Protest : २०२० सालचं शेतकरी आंदोलन आणि आत्ताच्या आंदोलनात फरक काय?

साहेबराव करपे यांना आदरांजली वाहण्यासाठी दर वर्षी १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन केले जाते. या वर्षी अकोला जिल्हयात मूर्तिजापूर तालुक्यात विविध शेतकरी संघटनांच्या पुढाकाराने बुधवारी हे अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रगती शेतकरी मंडळाचे प्रमुख राजू वानखडे यांनी दिली. वाशीम जिल्ह्यात भुमिपूत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विष्णूपंत भुतेकर हे सहकाऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, की केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या घटून १५ ते २० टक्के राहिली आहे.

तरीही महाराष्ट्रात दिवसाला सात ते आठ शेतकरी आत्महत्या होत आहेत. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावरील संकट अधिक वाढले आहे. नापिकी, नैसर्गिक संकटासोबत मानवनिर्मित संकटांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. उपवर शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने, शेतीतील मजूर, वाढलेला शेतीतील उत्पादन खर्च, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याचा वाढलेला खर्च, शासकीय यंत्रणेत वाढलेला भ्रष्टाचार या बाबींमुळे शेतकरी त्रस्त आहे. म्हणून बुधवारी (ता.१९) भूमिपुत्र संघटनेचे पदाधिकारी अन्नत्याग करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा व जिवंत शेतकऱ्यांना जागरूक करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

१९ मार्चला अन्नत्याग का?

राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालती करपे यांनी सहकुटुंब पहिली शेतकरी आत्महत्या १९ मार्च १९८४ ला केली होती. म्हणून हा दिवस ‘शेतकरी सहवेदना दिवस’ म्हणून पळाला जातो. याच दिवशी देशभर शेतकरी चळवळींकडून अन्नत्याग आंदोलन केले जाते. हा शेतकरी सहवेदना दिवस आहे. शेतकरी तथा शेतकऱ्याप्रति तळमळ असणाऱ्यांनी आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी बुधवारी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत उपवास करून सहवेदना अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com