Meat Ban Protest: स्वातंत्र्य दिनानिमित्त मांसविक्री बंदीच्या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचे कल्याण-डोंबिवलीत आंदोलन
Hindu Khatik Community: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्य दिनानिमित्त मांसविक्रीवर घातलेल्या बंदीच्या निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाने आज जोरदार आंदोलन केले. कोंबड्या आणून निषेध नोंदवणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत बंदी मागे घेण्याची मागणी केली.