मजुरांची कमतरता आणि अचानक होणार वातावरणातील बदल या समस्यांवर मात करून दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी आच्छादन आणि संरक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक असतो. आंबा, डाळिंब , पेरू आणि द्राक्ष या पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. .शेतकरी बागेतील तण काढण्यासाठी वारंवार मजुरांवर खर्च करतात किंवा तणनाशके फवारतात. तणनाशकांमुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणू नष्ट होतात..Fruit Farming: फळबागा ठरताहेत शेतकऱ्यांसाठी फलदायी.तणांच्या नियंत्रणासाठी विशिष्ट प्लॅस्टिक (सल्झर लूम) पासून बनवलेले वीड मॅट हा एक कायमस्वरूपी उपाय आहे. हे प्लॅस्टिक कापड जमिनीवर अंथरल्यामुळे सूर्यप्रकाश खाली पोहोचत नाही, परिणामी तण उगवू शकत नाही..Modern Fruit Farming: शेतीतच भविष्य शोधलेला‘बायोकेमिस्ट्री’चा तरुण.यामध्ये पाणी झिरपण्याची क्षमता आहे. प्रति चौरस मीटर १६ ते १८ लिटर पाणी सहज जमिनीत झिरपते. पावसामुळे किंवा ठिबकमुळे पाणी साचून राहत नाही. बाष्पीभवन कमी झाल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो, परिणामी ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते. हे जमिनीचे तापमान संतुलित ठेवते, ज्यामुळे मुळांची वाढ जोमाने होते..वीड मॅट पाच वर्षांहून अधिक काळ टिकते. एक एकरासाठी साधारण खर्च ४५,००० रुपये येतो, जो तणनाशक आणि मजुरांच्या पाच वर्षांच्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.- यशवंत जगदाळे ९६२३३८४२८७(विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.