Uday Samant
Uday SamantAgrowon

Loan Waiver of Interest : कर्जमाफीसह व्याजात सूट देण्यासाठी वित्त विभागाला प्रस्ताव

Uday Samant : बागायतदारांना कर्जमाफीचा लाभ मिळावा व व्याजात सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्यासंबंधी कार्यवाही केली जाईल.
Published on

Ratnagiri News : आंबा बागायतदारांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. बागायतदारांना कर्जमाफीचा लाभ मिळावा व व्याजात सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्यासंबंधी कार्यवाही केली जाईल.

तसेच बँकांनी सीबिल स्कोअर विचारात न घेता आंबा बागायतदारांना कर्ज उपलब्ध करून देण्याविषयी आणि विविध योजनांचे लाभार्थी बँकेमध्ये येत असतात त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. याबाबत सर्व बँकांना अग्रणी बँकेने निर्देश द्यावेत, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

Uday Samant
Maharashtra Politics : महायुती सरकारच्या चुका, भ्रष्टाचार जनतेपुढे मांडणार

जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सामंत बोलत होते. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने ही बैठकीत झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, उपसरव्यवस्थापक कृषी पणन मंडळ मिलिंद जोशी, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित होते.

Uday Samant
loan Waiver: महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची शक्यता कमीच?

पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘वानर व माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे पुरविण्यात आले आहेत. आंबा वाहतुकीसाठी सिंधुरत्न योजनेमार्फत सबसिडी देण्यात येईल. सप्टेंबरअखेरपर्यंत आवश्यक गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. सिंधुरत्न योजनेतून शेतकऱ्यांना कमी दरांमध्ये फवारणीसाठी औषधे, खते, अवजारे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा लवकरच रत्नागिरी येथे उभारण्यात येणार असून, त्याकरिता सिंधुरत्न योजनेतून निधी दिला जाईल. पणन विभागाने शेतकऱ्यांना हापूस जीआय मानांकन घेणे बंधनकारक करावे. जेणेकरून हापूस आंब्यांचा बोगस व्यापार थांबविणे शक्य होईल. भरारी पथकांची नेमणूक करून कर्नाटक आंबा हापूस आंबा म्हणून विक्री करताना आढळल्यास कारवाई करावी.

या बैठकीत जिल्हाधिकारी सिंह यांनी येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन आंबा बागायतदारांसाठी कर्जमाफी व व्याजामध्ये सूट मिळण्याकरिता तयार करण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत आढावा घेण्यात येईल, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com