Agriculture Management : पाणी, खतांचा योग्य वापर

Agriculture Update : पीक उत्पादनामध्ये पाणी आणि रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

Agriculture Management : पीक उत्पादनामध्ये पाणी आणि रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे. ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता येतो. ठिबक सिंचनामधून पाणी तसेच पाण्यात विरघळणारी रासायनिक खते ही पिकांच्या अवस्थेनुसार दिली जातात.

Agriculture
Agriculture Irrigation : उन्हाळी आवर्तनाला १ मार्चपासून सुरुवात

त्यामुळे पाणी आणि खतांचा कार्यक्षमवापर होऊन दोन्ही घटकांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते, पिकांचे चांगले उत्पादन मिळते.ठिबक सिंचनाचा आराखडा तयार करताना आपल्याकडे असणाऱ्या जमिनीचा प्रकार, जमिनीत पाण्याचे होणारे उभे आडवे प्रसरण, घ्यावयाचे किंवा असणारे पीक, पिकाच्या दोन ओळींतील आणि दोन रोपांतील अंतर, पिकाची जोमदार वाढीच्या अवस्थेतील असणारी पाण्याची गरज या बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

Agriculture
Soil Fertility : जमीन सुपीकतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

ठिबक सिंचन तंत्रज्ञानाने पाणी देण्याच्या बरोबरीने ज्या वेळी पिकांना सिंचन करतो, त्या वेळी पाण्यासोबत विरघळणारी रासायनिक खते व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकद्वारे देता येतात. यामुळे चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळते.

पिकाच्या गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पाणी दिल्यास पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. यासाठी आपल्या पिकाच्या लागवड तारखेनुसार आणि आपल्याकडील हवामानाचा विचार करून आपल्याकडील पंपाचा प्रवाह, बसविलेला ठिबक सिंचन संच, त्यामधून ताशी मिळणारा प्रवाह या सर्व बाबी विचारात घेऊन पिकास दररोज / एक दिवसाआड किती पाणी द्यावे, संच किती वेळ चालवावा याबद्दल तज्ज्ञांकडून तक्ता तयार करून घ्यावा. त्यानुसार ठिबक सिंचन संच चालवावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com