हेमंत जगतापशेडनेट हाउसच्या जागेची निवड आणि उभारणीची दिशा पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि संरचनेच्या टिकाऊपणासाठी अत्यंत महत्त्वाची असते. योग्य नियोजन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.शेडनेट हाउसची योग्य दिशा निवडल्याने आत हवा आणि प्रकाशाचे समान वितरण होते, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते..संरक्षित शेती म्हणजे पिकांचे उत्पादन नैसर्गिक प्रतिकूल हवामानापासून संरक्षण देऊन, नियंत्रित वातावरणात घेण्याची आधुनिक शेती पद्धत. या पद्धतीत तापमान, आर्द्रता, प्रकाश, पाणी व खत यांचे नियोजन करता येते. संरक्षित शेती मध्ये पॉलिहाउस, शेडनेट हाउस, लो टनेल, हाय टनेल असे प्रकार वापरून प्रतिकूल हवामानामध्ये भाजीपाला पिकांची योग्य प्रकारे लागवड करू शकतो. शेडनेट हाउसच्या जागेची निवड आणि उभारणीची दिशा पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि संरचनेच्या टिकाऊपणासाठी अत्यंत महत्त्वाची असते.योग्य नियोजन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते..Shade Net House: हवामान बदलात शेती कशी करावी, शेडनेटगृहाचे फायदे काय आहेत?.जागेची निवडजमिनीचा प्रकारसमतल, सुपीक व पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन असावी. निचरा व्यवस्थित होत नसेल तर शेडनेट हाउसच्या भोवती पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढावेत.चिकणमातीपेक्षा गाळमातीची जमीन योग्य असते.जमिनीत पाणी साचू देऊ नये.पाण्याचा पुरवठा.ठिबक सिंचनासाठी स्वच्छ व पुरेसा पाण्याचा सततचा पुरवठा उपलब्ध असावा.शेडनेट हाउसपासून पाणी स्रोत जवळ असणे फायदेशीर ठरते.पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठ्याची सुविधा जवळपास असावी. पाण्याचा सामू साधारणपणे ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा. क्षारता कमी असावी.वाऱ्याची दिशा आणि वेगवारंवार तीव्र वाऱ्याच्या क्षेत्रात शेडनेट हाउस उभारू नये..Shed Net House: हवामान बदलातील सुरक्षित शेतीसाठी शेडनेटगृहाचा स्मार्ट मार्ग.सूर्यप्रकाशपिकांना पुरेसा प्रकाश मिळावा. उभारणीसाठी सावलीदार झाडांच्या परिसरातील जागा निवडू नये.जागा भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी असावी. मोठ्या झाडांची सावली शेडनेट हाउसवर पडणार नाही याची खात्री करावी.रस्ता, वीजवाहतुकीसाठी सोईचा रस्ता, वीज व मजुरांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतीमाल आणि साहित्य वाहून नेणे सोपे होईल..दिशाशेडनेट हाउसची योग्य दिशा निवडल्याने आत हवा आणि प्रकाशाचे समान वितरण होते, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.उत्तर-दक्षिण दिशाभारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये उत्तर-दक्षिण दिशा सर्वोत्तम मानली जाते. या दिशेमुळे दिवसभर सूर्यप्रकाश समान प्रमाणात सर्व झाडांवर पडतो.पिकांच्या वाढीसाठी व प्रकाशसंश्लेषणासाठी योग्य वातावरण तयार होते..Poly house-Shed net: साहित्य दरवाढीने ७५ टक्के ‘पॉलिहाऊस-शेडनेट’ रद्द.पूर्व-पश्चिम दिशाही दिशा फक्त थंड हवामान असलेल्या भागात किंवा उच्च उंचीवरील भागात उपयुक्त ठरते, जिथे सूर्यप्रकाश कमी असतो.प्रकारानुसार उभारणीची दिशागोलाकार छत असलेले शेडनेट हाउसलांबी दक्षिण-उत्तर अशी असावी. या दिशेमुळे पश्चिमेकडील वारा सहजपणे पूर्वेकडे निघून जातो, ज्यामुळे शेडनेट हाउसमध्ये हवा खेळती राहते आणि तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते..सपाट छत असलेले शेडनेट हाउससपाट छताच्या शेडनेट हाउससाठी कोणतीही दिशा ठेवली तरी चालते. दिशा निवडण्याचे विशेष बंधन नसते.दिशा निवडताना स्थानिक वाऱ्याची दिशा आणि मावळत्या सूर्याचा प्रभाव देखील विचारात घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून संरचनेमध्ये हवामानाचे चांगले नियंत्रण ठेवता येईल..बांधकामाचे नियोजनबांधकामापूर्वी जमिनीचे समतलीकरण करावे.ठिबक सिंचन प्रणाली आणि प्लॅस्टिक मल्चिंग याचे नियोजन करावे.वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध बाजूला प्रवेशद्वार ठेवावा.शेडनेटची निवड पिकाच्या प्रकारानुसार करावी (उदा. ५० टक्के, ७५ टक्के शेडिंग).स्ट्रक्चर मजबूत ठेवण्यासाठी जीआय पाइप व योग्य फाउंडेशन वापरावे..शेडनेट टक्केवारीची निवडपीक व हवामानानुसार नेट निवडणे महत्त्वाचे आहे.३५ ते ४० टक्के : फुलझाडे, रोपवाटिका५० टक्के : भाजीपाला (टोमॅटो, मिरची, काकडी)७५ टक्के : नर्सरी, पालेभाजीयूव्ही स्टेबिलाइज नेट वापरावे.कव्हरिंग आणि फिटिंगनेट नीट ताणून बसवावे.दोरी, क्लिप्स दर्जेदार असाव्यात. जॉइंट्स मजबूत ठेवावेत.फाटण्याची शक्यता असलेली ठिकाणे संरक्षित करावीत..हवा आणि तापमान नियंत्रणसाइड नेट योग्य उंचीपर्यंत ठेवावे.आवश्यक असल्यास व्हेंटिलेशन नेट, कीटक नियंत्रक नेट वापरावे.उन्हाळ्यात अतिरिक्त सावली किंवा पांढरी शेडनेट वापरावी.पाणी व सिंचन व्यवस्थाठिबक सिंचनाचा वापर करावा. पाण्याचा दाब संतुलित असावा.फिल्टर, व्हॉल्व्ह नीट बसवावेत..कीड, रोग नियंत्रणप्रवेशद्वाराजवळ डबल डोअर पद्धतीचा अवलंब करावा.कीटक नियंत्रक नेटचा वापर करावा.स्वच्छता व निर्जंतुकीकरणाची काळजी घ्यावी.देखभालशेडनेटची नियमित तपासणी करावी.तुटलेले/फाटलेले भाग त्वरित दुरुस्त करावेत.पावसाळा व वादळी वाऱ्याआधी विशेष काळजी घ्यावी.- हेमंत जगताप ८२७५३७१०८२(वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.