Cow
CowAgrowon

Goseva Ayog : गोसेवा आयोगातर्फे विविध योजनांना चालना ः मुंदडा

Animal Husbandry : डी. ई. सोसायटी टेक्निकल इन्स्टिट्यूट, पुणे आणि मोरोपंत पिंगळे गोधन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशी गायींच्या शेणापासून रंग-एक पाऊल शाश्वत दिशेने‘ या विषयावर गुरुवारी (ता. १५) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
Published on

Pune News : डी. ई. सोसायटी टेक्निकल इन्स्टिट्यूट, पुणे आणि मोरोपंत पिंगळे गोधन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशी गायींच्या शेणापासून रंग-एक पाऊल शाश्वत दिशेने‘ या विषयावर गुरुवारी (ता. १५) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या परिसंवादाचे उद्‍घाटन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश जाधव उपस्थित होते.

Cow
Goseva Ayog : गोसेवा आयोग विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर

या वेळी शेखर मुंदडा म्हणाले, की महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत देशी गोवंश संवर्धनासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या साहाय्याने स्मार्ट गोशाळा प्रकल्पाची आखणी झाली आहे.

Cow
Goseva Aayog : ‘गोसेवा आयोग’ चे स्वागत, पण...

शेण, गोमूत्रापासून सेंद्रिय खत, सीएनजी, विविध उत्पादने तसेच देशी गोवंशाच्या शेणापासून रंग निर्मिती हा गोशाळांच्या आर्थिक उत्पन्नासाठी चांगला पर्याय आहे. यातून ग्रामीण भागामध्ये शाश्वत उद्योग उभे राहातील.

परिसंवादात जयपूर येथील कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ डॉ. साक्षी अग्रवाल यांनी खादी प्राकृत रंगनिर्मितीबाबत मार्गदर्शन केले. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पिंजारी यांनी गोमय आधारित लेदर, बायोडिझेल तसेच पर्यावरणपूरक उत्पादनांबाबत माहिती दिली.

परिसंवादासाठी संस्थेच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सदस्य जगदीश कदम, डॉ. रवींद्र आचार्य, खेमराज रणपिसे, धनंजय कुलकर्णी, डॉ. नितीन मार्कंडेय तसेच राज्यातील गोशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती गोसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष मयुरेश जोगदंड यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com