Sustainable Farming: पश्चिम आशियातील युद्धामुळे रासायनिक खतांची टंचाई तसेच किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर शाश्वत, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक उपाय महिला पशुपालकांनी प्रॉम खताच्या माध्यमातून शोधला आहे. फलटण (जि. सातारा) येथील ‘गोविंद फाउंडेशन’ने महिला पशुपालकांना प्रॉम खत निर्मिती आणि वापराबाबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत..या बाबत प्रतीक्षा खेतमाळीस म्हणाल्या, की रासायनिक खतांची टंचाई आणि जमीन सुपीकतेचा प्रश्न लक्षात घेऊन ‘गोविंद फाउंडेशन’ने पशुपालक महिलांना गेल्या चार वर्षांपासून प्रॉम (स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत) निर्मितीबाबत माहिती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली..Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित .शेणखत, शेतीतील पीक अवशेष आणि रॉक फॉस्फेट यांच्या योग्य मिश्रणातून प्रॉम खत तयार करता येते. आतापर्यंत १३६५ महिला पशुपालकांनी या बाबत प्रशिक्षण घेतले असून, त्यांनी स्वतःच्या शेतात कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रॉम खत वापरण्यास सुरुवात केली आहे. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या खतामुळे जमिनीची सुपीकता वाढली, मातीचा भुसभुशीतपणा सुधारला आणि पिकांची वाढ चांगली झाली. विशेष म्हणजे, रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला. .मिर्ढे (ता. फलटण, जि. सातारा) येथील प्रयोगशील पशुपालक मनीषा यादव म्हणाल्या, की गेल्या तीन वर्षांपासून मी ‘गोविंद फाउंडेशन’च्या मार्गदर्शनानुसार प्रॉम खताची निर्मिती आणि वापर करत आहे. .Fertilizer Stock Increase: मागील वर्षीपेक्षा यंदा २६ टक्के अधिक खतसाठा.भुईमुगामध्ये याचा वापर केल्याने चांगले उत्पादन मिळाले. कमी पाण्यामध्ये पिकाची चांगली वाढ झाली, जमिनीची गुणवत्ता सुधारली. रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला. अतिरिक्त तयार होणारे प्रॉम खत परिसरातील शेतकऱ्यांना विकले आहे. काही महिला पशुपालक माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या शेतीसाठी हे खत तयार करत आहेत..जमीन आरोग्य आणि संतुलित पीक पोषण हे दोन्ही उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने प्रॉम खत अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे सेंद्रिय आणि रासायनिक खत एकत्रित दिले जाते. दोन्हीची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढते.- डॉ. हरिहर कौसडीकर, (विभाग प्रमुख, मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी).महिलांनी शेती आणि पशुपालनामध्ये स्वतःची ओळख तयार केली आहे. येत्या काळात पशुपालक महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून प्रॉम खत निर्मितीला चालना देण्याचे नियोजन केले आहे. याचा जमीन सुपीकतेबरोबरीने महिलांच्या अर्थकारणाला फायदा होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकतेची भावना वाढीस लागली आहे.- शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, संचालिका, गोविंद फाउंडेशन, फलटण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.