Aeroponic Technology : एरोपोनिक्स तंत्राने बाटाट्याचे उत्पादन

हरियाणा राज्यातील करनाल जिल्ह्यातील बटाटा तंत्रज्ञान केंद्राने एरोपोनिक्स तंत्राने बाटाट्याचे उत्पादन घेतले आहे.
Aeroponic Technology
Aeroponic TechnologyAgrowon
Published on
Updated on

हरियाणा राज्यातील करनाल जिल्ह्यातील बटाटा तंत्रज्ञान केंद्राने (Potato Technology Centre ) एरोपोनिक्स तंत्राने बाटाट्याचे उत्पादन घेतले आहे. सहसा एरोपोनिक तंत्रज्ञान (Aeroponic Technology) व हायड्रोपोनिक्स (Hydroponic Technology) या दोन्ही तंत्रज्ञानाला एक सारखे समजले जाते. या दोन्ही प्रकारात शेती करण्याची पद्धत सारखी आहे. या प्रकारांमध्ये शेती करतांना मातीची गरज भासत नाही. मात्र या शेती प्रकारात ज्या पद्धतीने पोषकतत्व पिकांपर्यंत पोहोचविले जातात त्यात खूप मोठा फरक आहे. एरोपोनिक तंत्रज्ञानामध्ये पिकांच्या लटकत्या मुळांवर आवश्यक खते मिसळलेले पाणी फवारुन पोषकतत्व दिले जातात. तर हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये पिकांना पूर्णवेळ पाण्यात ठेऊन वनस्पतींची लागवड केली जाते.  

Aeroponic Technology
Agriculture Technology : विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे

काय आहे एरोपॉनिक तंत्रज्ञान?

एरोपोनिक या प्रकारात बटाट्याचे पीक हे एका बंद वातावरणात घेतले जाते. यात पीक हे वरच्या बाजूला तर मुळे ही खालच्या बाजूने व अंधारात ठेवली जातात. खालच्या बाजूला पाण्याचे फवारे लावलेले असतात. या पाण्यात पिकाला आवश्यक खते मिसळून ती मुळांपर्यंत पोहोचविली जातात. वरच्याबाजूने पिकांना सूर्यकिरण तर खालच्या बाजूने पोषक तत्व मिळतात, या पद्धतीने पिकांची वाढ होत राहते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊन अधीक उत्पन्न घेता येणार आहे. त्यामुळे बटाटा तंत्रज्ञान केंद्राला मिळालेल्या या यशानंतर कृषि विभागाने इतर राज्यातील फलोत्पादन विभाग व शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Aeroponic Technology
Drone Technology : महिलांनी गिरविले ड्रोन हाताळण्याचे धडे

कमी पाण्यात अधिक उत्पादन`शक्य 

एरोपोनिक तंत्रज्ञान हे उत्पादनाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर आहे. मात्र यासाठीचा सेटअप उभा करणे खर्चीक आहे. ज्याच्याकडे बागकामाचा चांगला अनुभव आहे. असे शेतकरी पॉलीहाउस उभारून चांगल्या पद्धतीने बटाट्याचे उत्पादन घेवू शकतात. या शेती प्रकारात अत्यंत कमी पाण्याची आवश्यकता असल्याने कमी पाणी असलेल्या भागात देखील शेतकरी याचा सेटअप उभारून चांगले पीक घेऊ शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com