
Nanded News : नांदेड जिल्ह्यात २६ ठिकाणी सोयाबीनचे किमान हमीदर खरेदी केंद्र सुरु केले. या खरेदी केंद्रावर अद्याप सोयाबीन खरेदीला अद्याप गती आली नाही. या खरेदी केंद्रावर १८ हजार ७४ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपूर्व नोंदणी केली. परंतु आजपर्यंत १०७३ शेतकऱ्यांच्या १८ हजार ८० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.
केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड व एनसीसीएफमार्फत मुग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरु झाली. तर मुग, उडीद खरेदी १० ऑक्टोबरपासून आणि सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात नाफेडकडून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून २१ तर दि. विदर्भ को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनद्वारे पाच अशा एकूण २६ खरेदी केंद्र मंजूर आहेत. त्याच्यामार्फत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदी केंद्रावर उडीद आणि मुगासाठी एकही शेतकऱ्यांनी नोंद केली नाही.
मात्र सोयाबीन विक्रीसाठी आजपर्यंत १८ हजार ७१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीनंतर ते विक्रीसाठी खरेदी केंद्राच्या संदेशाची वाट बघितली. परंतु केंद्र चालककेंद्र स्थानिक बाजार समितीच्या बाजारात सोयाबीनची विक्री करावी लागत आहे.
खरेदी केंद्रनिहाय सोयाबीन खरेदी (क्विंटलमध्ये)
नांदेड फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संघ, अर्धापूर - २५००, तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, मुखेड - २५००, तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, हदगाव - ५८७, तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, बिलोली - ४३, पंडित दीनदयाळ अभिनव सहकारी संस्था, देगलूर - ५८९ तालुका सहकारी खरेदी विक्रीसंघ, लोहा - शुन्य, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट - २०५२,
मुण्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी लि. धनंज (ता. मुखेड) - १७२३, श्री जगदंब शेतकरी उत्पादक कंपनी लि. जांब बु. ता. मुखेड ७४, राधामाई शेतकरी उत्पादक कंपनी लि. रातोळी (ता. नायगाव) -१२७६, अष्टविनायक सहकारी संस्था, मानवाडी फाटा (ता. हदगाव) - शून्य, तिरुपती शाहापूर शेतकरी उत्पादक कंपनी लि. वन्नाळी (ता. देगलूर) - १०१९, सिध्दराम शेतकरी उत्पादक कंपनी लि. बेटमोगरा (ता. मुखेड) - २५, कृषी उत्पन्न बाजार समिती, नायगाव - ९२५, तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, धर्माबाद - १५९१ व बोथी ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनी लि. उमरी - १५५६.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.