Yavatmal News: सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यंदा बराच काळ माल साठवून ठेवला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन असेपर्यंत दरात फारशी हालचाल झाली नाही. पैशांची गरज भागवण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली. त्यानंतरच आता बाजारात दरात सुधारणा झाली असून, या दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होताना दिसत आहे..सोयाबीन हे खरीपातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. रब्बी हंगामासाठी लागणारा पैसा या पिकातून मिळतो. मात्र, यंदा अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी मिळालेल्या चांगल्या दरांच्या पार्श्वभूमीवर यंदाही तशीच परिस्थिती राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळे अनेकांनी सोयाबीन साठवून ठेवले..Soybean Prices: नांदेडमध्ये प्रक्रिया उद्योगांचे सोयाबीन दर ‘एमएसपी’नजीक .दर मात्र दीर्घकाळ वाढले नाहीत. उलट, १५ दिवसांपूर्वी जनरल सोयाबीनचे दर ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. त्यामुळे लागवडीचा खर्च तरी निघेल का, या विवंचनेत शेतकरी सापडले होते. अखेर परिस्थितीपुढे हतबल होत बहुतेक शेतकऱ्यांनी माल विकला. त्यानंतर आता बाजारात दरात सुधारणा झाली आहे. .गेल्या काही दिवसांपासून दरात हळूहळू सुधारणा होत असल्याने बाजारात आवक वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र, या आवकीत फार कमी प्रमाणात शेतकऱ्यांचा माल आहे. मोठे शेतकरी तसेच व्यापाऱ्यांचाच सोयाबीन अधिक प्रमाणात येत असल्याचे दिसून येत आहे. दरात सुधारणा झाल्याने काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी दरवाढीचा मोठा लाभ त्यांच्या हातातून निसटल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. .Soybean Prices: सोयाबीनच्या दरामध्ये उसळी.सध्या सामान्य सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले आहेत, तर बिजवाई सोयाबीनचे दर थेट ६ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, आता फार मोजक्या शेतकऱ्यांच्या घरातच सोयाबीन शिल्लक आहे. मोठ्या प्रमाणावर माल व्यापारी आणि काही मोठ्या शेतकऱ्यांकडेच असल्याने दरवाढीचा खरा फायदा त्यांनाच मिळत आहे..शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतरच आता दर वाढत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा लाभ फार कमी शेतकऱ्यांना होत आहे. सध्या शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांकडेच जास्त सोयाबीन आहे.- साहेबराव पाटील, शेतकरी, राळेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.