Prices Leafy Vegetables : कोथिंबीर, मेथीसह पालेभाज्यांचे दर उतरले, गवारी अजूनही तेजीत

Vegetables Rate : गवार, हिरवी मिरची, वांग्याचे दर शंभरीच्या आसपास आहेत. टोमॅटो ५० ते ८० रुपये किलो असा दर झाला आहे.
Prices Leafy Vegetables
Prices Leafy Vegetablesagrowon

Kolhapur Vegetables Rate : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने पालेभाज्या बाजारात मोठी आवक सुरू झाली आहे. दरम्यान कोथिंबीर, मेथीसह अन्य पालेभाज्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पडवळ, हिरवे टोमॅटो, ढबू मिरची, कारली, काकडी, दुधी भोपळा आदी फळभाज्यांचे दरही कमी झाले आहेत.

गवार, हिरवी मिरची, वांग्याचे दर शंभरीच्या आसपास आहेत. टोमॅटो ५० ते ८० रुपये किलो असा दर झाला आहे. सध्या मिरज, सांगली, चिक्‍कोडी, गोकाक आदी भागांतून पालेभाज्यांची कोल्हापुरात आवक होत आहे.

पालेभाज्यांचे दर (रुपयांत)

मेथी २०, अंबाडी १०, पालक १५, शेपू २०, कोथिंबीर ३० ते ४०, कांदापात २०, पोकळा १०, लाल माठ १०, तांदळी १०, पुदिना १०.

फळभाज्यांचे किलोचे दर (रुपयांत)

दोडका ४० ते ६०, वांगी ६० ते १००, टोमॅटो ५० ते ६०, ढब्बू मिरची ५० ते ८०, गवार १०० ते ११०, भेंडी ४० ते ६०, वरणा ८०, गाजर ४०, आले ८० ते१००, बिनीस १००, फ्लॉवर ३० ते ५०, बीट १०, पडवळ १० ते ३० रू., शेवगा १५ रू. तीन नग. कणीस ( स्वीट कॉर्न) १० ते १५ रू नग, कोबी १० ते ४० रू. नग

Prices Leafy Vegetables
Kolhapur Sangli Flood : धास्ती महापुराची! जागतिक बँकेच्या पथकाची आपत्ती व्यवस्थापन विभागाला अचानक भेट, अधिकाऱ्यांकडून सूचना

बेळगावसह चिक्‍कोडीतून भाजीपाल्याची आवक

बेळगाव, चिक्‍कोडी, सांगली, मिरज येथून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली होती. त्यामुळे रविवारच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, तांदळी, लालमाठ, अंबाडा, आंबट चुका विक्रीसाठी आला होता. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने त्या भाज्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.

अननस, पेरू, सफरचंदाला मागणी

राणी अननसाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दरही तीस ते साठ रुपये प्रती नगाला आहेत.

फळांचे दर (रुपयांत)

सफरचंद १३० ते २७५ किलो, माल्टा १००, डाळिंब ६० ते १००, सीताफळ ४० ते ६०, ड्रॅगन १००, खजूर ५०, तोतापुरी आंबा १०० रु. तीन नग, मोसंबी १००, कलिंगड ५०, अननस ३० ते ६० रु. नग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com