Raigad News: समुद्रातील ताज्या मासळीला सध्या प्रचंड मागणी असली तरी बदलत्या हवामानाचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. पहाटे गारठा आणि दुपारनंतर झपाट्याने वाढणारे तापमान असे विचित्र वातावरण सध्या अनुभवास येत असून, या चढउतारामुळे समुद्रातील मासळीची ठिकाणे शोधणे मच्छीमारांसाठी कठीण झाले आहे. परिणामी अनेक मच्छीमारांना मासळी न मिळाल्याने खाली हात परतावे लागत आहे..हवामानातील बदलांचा फटका थेट तंत्रज्ञानालाही बसत आहे. मासे शोधण्यासाठी वापरले जाणारे ‘फिश फाइंडर’ किंवा ‘इको साउंडर’सारखी सोनार तंत्रज्ञानावर आधारित उपकरणेही अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे मच्छीमार सांगतात. तापमानातील अचानक बदलामुळे मासे आपली ठिकाणे बदलत असल्याने रडारवर अचूक नोंद मिळत नाही, याचा परिणाम मासेमारीवर होत आहे. .Fish Rate : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागणीमुळे मासळीच्या दरात सुधारणा ; पापलेट १४०० तर सुरमई १२०० रुपये प्रति किलो.याचा थेट परिणाम बाजारपेठेत दिसून येत आहे. ताज्या मासळीचे दर सध्या तिप्पट वाढले असून सुरमय, पापलेट, कोळंबी यांसारखी लोकप्रिय मासळी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. काही दिवसांपूर्वी चार पापलेट साधारण ४०० रुपयांना मिळत असत; मात्र त्याच आकाराचे पापलेट सध्या १,२०० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. .Fish Rate : पापलेट १ हजार, सुरमई ८०० रूपये प्रतिकिलो.तापमानात चढ-उतारनवगाव येथील मच्छीमार साईनाथ पावसे यांनी सांगितले की, एकाच दिवसात तापमानात मोठे चढउतार होत आहेत. यामुळे समुद्रातील मासे आपली ठिकाणे बदलतात. अद्ययावत रडार यंत्रणेवर आधारित फिश फाइंडर यंत्रालाही माशांची ठिकाणे शोधणे अवघड होते. तसेच पौर्णिमेनंतर भरती असल्यानेही मासेमारीवर परिणाम होत आहे. मात्र ही परिस्थिती बदलल्यानंतर मासळी उपलब्ध होण्याची शक्यता ल्याचे त्यांनी व्यक्त केले..मासळी मिळत नसल्याची अनेक कारणे असली तरी बेकायदेशीर होणारी मासेमारीही तितकीच कारणीभूत आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.- अनंत चोगले, मच्छीमार.मासेमारीला गेल्यानंतर डिझेल खर्च, नोकरांचा पगार, त्यांच्या जेवणाचा एका फेरीचा खर्च लाखापेक्षा जास्त होतो. हा खर्च भागेल इतकीही मासळी मिळत नाही.- संजय डबरी, मच्छीमार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.