Sowing Update
Sowing Update Agrowon

Sowing Update : कोल्हापुरात धूळवाफ पेरण्यांची तयारी सुरू

Kharif Season : सध्‍या कोल्हापूर जिल्ह्यात धूळवाफ पेरण्यांची तयारी सुरू असली तरी बहुतांश भागाला मॉन्सून पूर्व पावसाची गरज आहे.

Sowing In kolhapur : सध्‍या कोल्हापूर जिल्ह्यात धूळवाफ पेरण्यांची तयारी सुरू असली तरी बहुतांश भागाला मॉन्सून पूर्व पावसाची गरज आहे. ज्या भागात पावसाच्या सरी झाल्या आहेत त्या भागात पेरणीपूर्व मशागतींना हळूहळू गती येत आहे.

Sowing Update
Sowing Machine : पेरणी यंत्रांमुळे होतेय वेळ, बियाणे बचत

गेल्या अनेक वर्षांपासून ‘रोहिणीचा पेरा, त्याला मोत्याचा तुरा’ अशी शेतकऱ्यांमध्ये असणारी धारणा आणि याच धारणेनुसार होणारी पेरणी मात्र बेभरवशाच्या पावसामुळे मंदावली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांसाठी मशागतीची कामे सुरू झाली आहेत.

यावर्षी वळीव पावसाने म्हणावी तशी साथ दिलेली नाही. त्यामुळे रोहिणीचा पेरा चुकवावा लागत आहे. वास्तविक रोहिणी नक्षत्रामध्ये भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर धान्य आणि कडधान्य पेरणीला गती येते.

गेल्या महिन्याभरात ज्या-ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ठिकाणच्या मशागतींची कामे पूर्ण झाली आहेत. राधानगरी, शिरोळ, हातकणंगले, आजरा, चंदगड तालुक्यातील ७० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र पेरणीसाठी सज्ज झाले आहे.

रोहिणी नक्षत्र मात्र कोरडेच जाणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत जिल्ह्यात मॉन्सून पूर्व पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाच्या भरवशावरच पेरण्या केल्या जाणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com