Weather Impact: माण तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागासह अनेक ठिकाणी बुधवारी (ता. १८) दुपारी अचानक पावसाने दमदार हजेरी लावत सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली. अचानक आलेल्या या पावसामुळे सुगीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली. शेतात काढणीसाठी तयार असलेला गहू, हरभरा यांसारखी पिके भिजू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र अनेक ठिकाणी कडबा भिजल्याने नुकसान झाले. तसेच द्राक्षे, डाळिंबाची केळी या सारख्या नगदी पिकांनाही या अवेळी झालेल्या पावसाचा फटका बसला..शिखर शिंगणापूर, मोही, खुटबाव, डंगिरेवाडी, सोकासन, राणंद, गोंदवले खुर्द, वावरहिरे, वडगाव, कोकरेवाडी, शेवरी, बल्लाळवाडी आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला..Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट.तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांची काढणी सुरू केली असताना गारपीट झाल्याने नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरेगाव, पाटण तालुक्यांतही काही ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. .दरम्यान, फलटण तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसासह गारपीट झाली. सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. तालुक्यातील गिरवी व धुमाळवाडी परिसरात सायंकाळी सुमारे चार ते पाचच्या दरम्यान १५ मिनिटे गारपिटीसह हलका पाऊस झाला. .Unseasonal Rain: पूर्वमोसमी पाऊस, गारपिटीचा घाटनांद्रा परिसराला तडाखा.त्यामुळे या भागातील फळबागांना फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे, तसेच ढवळ, वाखरी, ताथवडा आणि सासवड परिसरातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील गिरवी व धुमाळवाडी परिसरात आंबा, अंजीर, डाळिंब, द्राक्षे आणि पेरू या फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. गारपिटीमुळे फळबागांची पाने व कळ्यांची गळती, आंब्याच्या कैऱ्या पडणे तसेच फळांवर डाग पडण्याची भीती निर्माण झाली आहे..तालुक्यातील गिरवी व धुमाळवाडी परिसरात आंबा, अंजीर, डाळिंब, द्राक्षे आणि पेरू या फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. गारपिटीमुळे फळबागांची पाने व कळ्यांची गळती, आंब्याच्या कैऱ्या पडणे तसेच फळांवर डाग पडण्याची भीती निर्माण झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.