
श्रीमती नीलेश्वरी वऱ्हेकर
Fishries Scheme: प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना (PM-MKSSY) ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत केंद्रीय क्षेत्र उपयोजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट मत्स्य व्यवसायाचे मत्स्य क्षेत्रातील सूक्ष्म व लघू उद्योगांना चालना देणे आहे. २०२३-२४ ते सन २०२६-२७ या वर्षात सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशात ६००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे. भारतीय मत्स्य व्यवसाय विकासातील सध्याच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे.
मत्स्य व्यवसायवाढीसाठी मत्स्यपालक, मच्छीमार, मत्स्य कामगार, मत्स्य विक्रेते, प्रक्रिया करणारे आदींसाठी राष्ट्रीय मत्स्य डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) वर नोंदणी करून कर्ज, विमा व शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होत आहे. या नोंदणीसाठी जागरूकता व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.
मत्स्य व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक दस्तऐवजीकरणास साहाय्य, आर्थिक साक्षरता, प्रशिक्षण, व कर्ज प्रक्रियेतील शुल्काची परतफेड केली जाईल. ५,५०० मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना व्यवसाय योजनेसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये मदत दिली जाणार आहे.
मत्स्यपालकांना जलसंपदा विमा स्वीकारण्यासाठी चार हेक्टरपर्यंत क्षेत्रासाठी ४० टक्के (कमाल १ लाख) प्रोत्साहन देण्यात येईल. एससी, एसटी, महिलांना १० टक्के अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. केज कल्चर, आरएएस, बायोफ्लॉक, रेसवेजसाठीही प्रोत्साहन मिळणार आहे.
मूल्यसाखळी सुधारणा
सूक्ष्म उद्योगांना उत्पादन, रोजगार निर्मिती, व महिलांना प्राधान्य देत कामगिरी आधारित अनुदान.
सामान्यांसाठी गुंतवणुकीच्या २५ टक्के किंवा ३५ लाख रुपये (जे कमी असेल)
एससी, एसटी, महिलांसाठी: ३५ टक्के किंवा ४५ लाख रुपये (जे कमी असेल)
एसएचजी, एफएफपीओ, सहकारी संस्थांसाठी : ३५ टक्के किंवा २ कोटींपर्यंत अनुदान.
गुणवत्ता व सुरक्षितता खात्री प्रणाली
मत्स्य व मत्स्य उत्पादनांची सुरक्षितता वाढविण्यासाठी लघू व सूक्ष्म उद्योगांना गुणवत्ता प्रणाली स्वीकारण्यासाठी अनुदान.
लघू उद्योगांसाठी २५ टक्के किंवा ७५ लाख रुपये.
एससी, एसटी, महिलांसाठी : ३५ टक्के किंवा १ कोटी
लाभार्थी
मत्स्यपालक, मच्छीमार, कामगार, विक्रेते.
सूक्ष्म व लघू उद्योग, एसएचजी, एफएफपीओ, स्टार्टअप्स.
एससी, एसटी, महिला लाभार्थ्यांना विशेष प्रोत्साहन.
अपेक्षित लाभ
डिजिटल नोंदणी
कर्ज मिळवण्यास सुलभता, सुरक्षित उत्पादनास प्रोत्साहन.
पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रसार.
रोजगार संधी, उत्पादन व मूल्यवर्धन वाढ.
निर्यात व उत्पन्न वृद्धी.
०७२१-२६६२८०१ प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय, अमरावती
- श्रीमती नीलेश्वरी वऱ्हेकर, ९७६६२९६६५७
(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, अमरावती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.