Satara News: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सातारा जिल्ह्याचे राजकीय रणांगण सत्तेच्या समीकरणांनी तापले आहे. बहुमताचा ३३ हा आकडा गाठण्यासाठी भाजपला ६ जागांची ओढ लागली असली, तरी ‘अध्यक्ष भाजपचाच होणार’ या दाव्याने खळबळ माजली आहे. दुसरीकडे, १५ जागा जिंकून सत्तेच्या चाव्या हाती घेतलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत दिल्याने भाजपची कोंडी होण्याची चिन्हे आहेत..निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देत आक्रमक प्रचार केला होता. मात्र, ६५ पैकी २७ जागांवरच भाजपला समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीने २० जागा जिंकून आपले अस्तित्व टिकवले आहे. प्रचारादरम्यान भाजप नेते गणेश नाईक यांनी शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे दोन्ही पक्षांतील दरी वाढली आहे. ‘’मालकमंत्री’’ अशा शब्दांत झालेली टीका शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली असून, कार्यकर्त्यांनी भाजपसोबत जाण्यास कडाडून विरोध दर्शविला आहे..Satara ZP: सातारा ‘झेडपी’च्या सत्तेची किल्ली शिवसेनेच्या हाती.सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये सत्तेच्या वाटपाबाबत पडद्यामागे हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही नैसर्गिक युती होण्याची शक्यता अधिक आहे. तरीही, भाजपने आपला अध्यक्ष बसवण्याचा चंग बांधल्याने सदस्यांची ‘’फोडाफोडी’’ किंवा ‘’सौदेबाजी’’ होण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. आता स्थानिक पातळीवरील हा पेच सोडवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून हालचाली होणार की सत्तेचे नवे समीकरण आकाराला येणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..Satara ZP: सातारा ‘झेडपी’त त्रिशंकू स्थिती.फडणविसांवर मदारजिल्ह्यात भाजप-शिवसेना नेत्यांमधून विस्तव जात नसल्याने स्थानिक पातळीवर चर्चेची दारे बंद आहेत. शंभूराज देसाई यांनी अद्याप भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत भाजपला सत्ता हवी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुढाकार घ्यावा लागेल, अशी चर्चा भाजप गोटात आहे..मात्र, मतदारांनी भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला कौल दिल्याची भावना असल्याने, युती झाल्यास ती मतदारांशी प्रतारणा ठरेल, असा सूरही उमटत आहे. त्यामुळे अंतिम निर्णय ‘सागर’ बंगल्यावरून होतो की ‘वर्षा’वरून, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.