NTPC Solapur News: ‘एनटीपीसी’कडून ५५०० मिलियन युनिटसची वीजनिर्मिती

औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील वसाहतीमध्ये रुफस्टॅाप पॅनेलच्या माध्यमातून सौर ऊर्जा निर्मिती केली जात आहे.
NTPC Solapur
NTPC SolapurAgrowon
Published on
Updated on

Solapur News : आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्पाने (एनटीपीसी) ऊर्जा निर्मितीतील यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडीत काढले असून, यंदा सर्वाधिक ५५०० मिलियन युनिटस इतकी वीजनिर्मिती केली आहे, अशी माहिती एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापक विजय गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. सलग १२६ दिवस ऊर्जा निर्मिती करण्याचा विक्रमही आम्ही केला असल्याचे ते म्हणाले.

श्री. गोयल म्हणाले, की एनटीपीसीकडून २०२०-२१ मध्ये ३५८६ मिलियन युनिटस वीजनिर्मिती केली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये ५०८१ मिलियन युनिटस ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण केले. यंदा त्यात आणखी वाढ करत वीजनिर्मिती तब्बल ५५०० मिलियन युनिटसपर्यंत नेली.

औष्णिक ऊर्जेसह सौर ऊर्जा निर्मितीही केली जात आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील वसाहतीमध्ये रुफस्टॅाप पॅनेलच्या माध्यमातून सौर ऊर्जा निर्मिती केली जात आहे.

NTPC Solapur
Sharad Pawar : ‘वीजनिर्मिती कायदा २०२२’होऊ देणार नाही : पवार

आतापर्यंत १० मिलियन युनिटस सौर ऊर्जा निर्मिती केली गेली आहे. यापुढेही १३ मिलियनच्या सौर ऊर्जेचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. तेही लवकरच पूर्ण करू.

एनटीपीसी प्रकल्पामध्ये सध्या कोळशाबरोबरच बायोमास देखील वापरात आणले जात आहे. यामध्ये दररोज ७० ते ८० हजार मेट्रिक टन बायोमास लागते.

प्रकल्पासाठी सध्या कोळशाची टंचाई नाही, असेही ते म्हणाले. यावेळी महाव्यवस्थापक मुखोपाध्याय, ई. नंदकिशोर, मनोरंज सारंगी आदी उपस्थित होते.

पाच लाख झाडे लावली

औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्यावतीने दरवर्षी ५० हजार झाडे लावण्यात येत आहेत. आतापर्यंत प्रकल्पाच्या परिसरात साडेतीन लाख झाडे लावण्यात आली आहेत.

सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून इतर भागात दीड लाख झाडे लावली. एकूण पाच लाख झाडे आतापर्यंत लावली आहेत. यामुळे हरितपट्टा तयार करण्यात झाला आहे, असेही गोयल म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com