Nampur Market Committee : नामपूर बाजार समितीच्या नोकर भरतीला स्थगिती

Market Committee : सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीमध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या कथित नोकर भरती प्रकियेला जिल्हा निबंधक एस. वाय. पुरी यांनी स्थगिती दिल्याने एकच खळबळ उडाली.
Nampur Market Committee
Nampur Market CommitteeAgrowon

Nashik Market Committee News : सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीमध्ये विविध पदांसाठी सुरू असलेल्या कथित नोकर भरती प्रकियेला जिल्हा निबंधक एस. वाय. पुरी यांनी स्थगिती दिल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत खुद्द बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे यांनी सहकारमंत्री, पणन संचालक, जिल्हा निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार केल्याने सहकार खात्याने नोकर भरतीला स्थगिती दिली.

बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला सहकार खात्याने स्थगिती देऊन चाप लावला. याबाबत पणन संचालक काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाजार समितीमधील नोकर भरती प्रक्रिया सुरुवातीपासून संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. विद्यमान संचालक मंडळाकडून ‘अर्थपूर्ण’ घडामोडीतून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

यामुळे मोसम खोऱ्यातील बेरोजगार शेतकरी तरुणांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे सदर भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणी बाजार समितीचे सभापती, प्रगतिशील शेतकरी कृष्णा भामरे यांनी केली आहे.

Nampur Market Committee
Nampur APMC : नामपूर बाजार समिती दहा दिवस बंद

नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यालयीन कामकाजासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर, कनिष्ठ लिपिक, हेड वॉचमन, शिपाई, वॉचमन, वॉटरमन आदी १६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

या प्रक्रियेत होत असणाऱ्या कामकाजामध्ये विद्यमान संचालक मंडळातील काही संचालकांचे नातेवाईक यांना नियमबाह्य पद्धतीने सदर प्रक्रियेत नोकरीत पात्र ठरवून रिक्त जागांवर संचालकांच्या नातेवाईकांना नियुक्त करण्याचा घाट घातला जात आहे.

भरती प्रक्रियेमध्ये सर्व जागांवर यापूर्वी रोजंदारीने काम करणारे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांची यादीही निवेदनासोबत जोडल्याचे सभापती भामरे यांनी सांगितले.

भरती प्रक्रिया ही जनतेच्या व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणारी असून यामुळे शेतकऱ्यांच्या घामाच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होणार आहे.

सध्या कार्यरत असलेले रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी दोन ते तीन वर्षांपासून कार्यरत असून नंतर नियमाप्रमाणे शासनाच्या वेगवेगळ्या परवानग्या घेऊन सदर रिक्त पदांची जाहिरात संचालक मंडळाच्या सोयीनुसार वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या रिक्त पदांच्या भरतीसाठी सहकार प्रशिक्षण केंद्र नाशिक या संस्थेबरोबर पदभरती प्रक्रिया राबविण्याचा करारनामा करण्यात आला आहे. रिक्त पदांवर अनेक पात्र उमेदवारांनी अर्ज केले असून

त्यांची परीक्षा नाममात्र पद्धतीने घेण्यात आली आहे. अशा भ्रष्ट पद्धतीने होत असलेल्या पदभरती प्रक्रियेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे हुशार, पात्र मुले नोकरीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Nampur Market Committee
नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला बरखास्तीची नोटीस 
नामपूर बाजार समितीमधील नोकरभरतीच्या पार्श्‍वभूमीवर सभापती यांच्या अर्जानुसार सरळसेवा नोकरभरती प्रकियेला स्थगिती दिली आहे. याबाबतचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित राहील.
एस. वाय. पुरी, जिल्हा निबंधक
पणन संचालकांच्या निर्देशानुसार सेवक सूची, बिंदूनामावलीप्रमाणे १६ जागांसाठी नोकर भरती प्रकिया सुरू आहे. त्याबाबत दैनिकात जाहिरातही प्रसिद्ध झालेली आहे. जिल्हा निबंधक यांच्या मान्यतेनुसार उमेदवारांच्या लेखी, तोंडी परीक्षेसाठी समिती नेमली आहे. १६ जागांसाठी १५७ उमेदवारांनी अर्ज भरले असून लेखी परीक्षेला १०२ उमेदवार उपस्थित होते. तोंडी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची यादी घोषित केली जाईल.
संतोष गायकवाड, सचिव, नामपूर बाजार समिती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com