Post Monsoon Rain : राज्यातील ऊस हंगामाला ‘मॉन्सूनोत्तर’चा अडथळा

Sugarcane Crop Issue : यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यास केवळ पंधरवड्याचा कालावधी उरला आहे. राज्यातील बहुतांशी ऊस पट्ट्यात अजूनही अवकाळी पाऊस सुरू असल्याने हंगामाच्या प्रारंभीच कारखान्यांपुढील अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यास केवळ पंधरवड्याचा कालावधी उरला आहे. राज्यातील बहुतांशी ऊस पट्ट्यात अजूनही अवकाळी पाऊस सुरू असल्याने हंगामाच्या प्रारंभीच कारखान्यांपुढील अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस पडत असल्याने ऊस शिवाराची तळी झाली आहेत. अगदी माळभागातील शेतीलाही वाफसा नसल्याने यंदा ऊस हंगामाचा प्रारंभ धीमा होणार आहे.

परतीचा पाऊस झाल्यानंतर पाऊस थांबेल असा अंदाज होता. यानुसार कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू होईल या बेताने क्रमपाळीचे नियोजन सुरू केले होते. विधानसभा निवडणूक २० नोव्‍हेंबरला असल्याने बहुतांशी मजूर निवडणूक झाल्‍यानंतरच करार केलेल्या कार्यक्षेत्रात येतील अशी शक्यता आहे. यामुळे तांत्रिकदृष्‍ट्या कारखाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गतीने सुरू होणे अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्‍या असणारा पाऊस हंगाम वेळेत सुरू करणाऱ्याला मोठा अडथळा ठरणार असल्याने कारखान्यांना क्रमपाळीनुसार उसाची तोडणी करणे आव्‍हान ठरले आहे.

Sugar Factory
Sugar Factory : ...तरच साखर ठरेल गोड

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले. मे महिन्‍यापर्यंत पाण्यासाठी तरसणाऱ्या ऊस पिकाला जूननंतर आजतागायत पाण्‍याची फारशी गरज पडली नाही. दहा, बारा दिवसांच्या अंतराने सातत्याने पाऊस असल्याने शेतकऱ्यांना गेल्‍या दोन महिन्यांपासून पाणी द्यावे लागले नसल्‍याचे चित्र विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात आहे. दिवसभर कडक ऊन पडून सायंकाळी धुवाधार पाऊस असे चित्र सातत्‍याने आहे.

यामुळे माळरानावरील ऊस शेतीत सातत्याने पाणी साचून राहात आहे. जर हंगाम सुरू होण्यावेळी पाऊस आला तर माळरानावरील ऊस शेती कारखान्यांना तोडणीसाठी आधार ठरते. पण सध्या तरी माळरानावरही पाणी साचून असल्याने कारखान्यांपुढील डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सुरू झालेले कारखानेही उसाअभावी बंद ठेवणेही शक्‍य नसल्याने यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला कारखाने सुरू ठेवण्यासाठी यंत्रणेची कसोटी लागणार आहे.

Sugar Factory
Rajarambapu Sugar Factory : राजारामबापू साखर कारखान्याचे प्रदूषित पाणी कृष्णा नदीत, प्रदूषण मंडळाकडून नोटीस

यंत्रणा निवडणूक कामात

यंदाच्या निवडणुकांमध्ये बहुतांशी कारखानदार उमेदवार असणार आहेत. यामुळे सध्या कारखान्यांची यंत्रणा पूर्णपणे निवडणुकीच्या कामात असल्याचे बहुतांशी कारखान्यांतील चित्र आहे. फिल्‍डमनपासून ते कार्यकारी संचालकांपर्यंतच्या यंत्रणा निवडणुकीत असल्याने निवडणुका झाल्यावर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील अशी शक्‍यता आहे.

शिवारातील पाणी हटता हटेना

ज्या जमिनी सखल भागात आहेत. या जमिनीतील पाण्याचा निचरा करणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहेत. सखल भागात गेल्या महिन्‍याभरापासून पाणी थांबून असल्याने आणखी पाऊस न झाल्यास किमान महिना तरी वाफसा स्थिती येऊ शकणार नाही या परिस्थितीमुळे महिन्यात तोडी वेळेत सुरू करणे कारखान्यांपुढे आव्हान आहे.

९०४ लाख टन ऊस उपलब्ध

राज्य साखर आयुक्त कार्यालयाच्या अंदाजानुसार, २०२४-२५ हंगामात महाराष्ट्रात गाळपासाठी ९०४ लाख टन ऊस उपलब्ध असेल, जो गेल्या हंगामात १०७६ लाख टन गाळपाच्या तुलनेत कमी आहे. उपलब्ध उसापैकी सुमारे १२ लाख टन इथेनॉल उत्पादनासाठी वळवणे अपेक्षित आहे. यामुळे साखरेचे उत्पादन ९० ते १०२ लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील कारखान्यांनी ११० लाख टन साखरेचे उत्पादन केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com