
Maharashtra Weather update : पश्चिमी चक्रावाताचे प्रभावामुळे तसेच वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व नैऋत्येकडून राहण्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत हवामान ढगाळ (Cloudy Weather) राहील. उद्यापासून शुक्रवार (ता.६ ते १०) पर्यंत महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल तर उत्तर भारताच्या वायव्य दिशेस १०१४ ते १०१६ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील.
वारे उत्तरेकडील भागातून बाष्प वाहून आणतील. तसेच वाऱ्याची दिशा आग्नेय व नैऋत्येकडून राहणार असून वारे त्या दिशेकडूनही बाष्प वाहून आणतील.
अनुकूल हवामान स्थिती निर्माण होताच ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला वाशीम, अमरावती, भंडारा आणि नगर जिल्ह्यांत ४ ते ६ मिमी पावसाची शक्यता निर्माण होईल.
या आठवड्यात हवामान ढगाळ, कोरड्या व अस्थिर स्वरूपाचे राहील. यापुढील काळात कमाल तापमानात सातत्याने वाढ होत जाईल. तसेच किमान तापमानात हळूवारपणे वाढ होत जाईल. म्हणजेच एप्रिल महिना हा अतिउष्ण जाणवण्याची शक्यता आहे.
हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस, बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २७ अंश सेल्सिअस, अरबी समुद्राचे पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान २७.५ अंश सेल्सिअस तसेच प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस राहण्यामुळे सद्यःस्थिती प्रशांत महासागरात एल निनो तटस्थ स्थितीत राहील.
कोकण ः
उद्या (ता.६) ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४ मिमी पावसाची शक्यता असून वाऱ्याच्या वेगातही वाढ होईल. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस इतके अधिक राहणे शक्य आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश ढगाळ तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५९ ते ६९ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४२ ते ४८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २१ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.
वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व पालघर जिल्ह्यांत ताशी १० किमी, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ४ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आग्नेयेकडून तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
उद्या (ता.६) नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ५ ते ६ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ३७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १४ टक्के इतकी कमी राहील.
त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १३ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील.
मराठवाडा ः
उद्या (ता.६) जालना व धाराशिव जिल्ह्यांत ५ ते ६ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील.
जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश ढगाळ, तर धाराशिव, लातूर, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३२ टक्के, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २४ ते २७ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ६ ते १५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून व नैऋत्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
उद्या (ता.६) बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४ ते ५ मिमी तर अमरावती जिल्ह्यात १० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्य व आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील.
कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ टक्के इतकी कमी राहील.
मध्य विदर्भ ः
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
भंडारा जिल्ह्यात उद्या (ता.६) ४ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस तर गोंदिया जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस आणि भंडारा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. भंडारा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १३ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याची दिशा चंद्रपूर जिल्ह्यात आग्येनेकडून, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत नैऋत्येकडून राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी राहील.
पश्चिम महाराष्ट्र ः
उद्या (ता.६) नगर जिल्ह्यात ६ किमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस तर सातारा जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील.
सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के राहील. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते १३ टक्के इतकी कमी राहील.
वाऱ्याचा ताशी वेग पुणे व नगर जिल्ह्यात १२ ते १४ किमी, तर उर्वरित जिल्ह्यांत ताशी ७ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.
कृषी सल्ला ः
- पावसाची शक्यता असल्याने धान्य वाळविताना योग्य काळजी घ्यावी.
- जनावरांना लाळ्या व खुरकूत आजाराचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
- फळबागेत खोडाभोवती किंवा जमिनीवर आळ्यात गवत, पालापाचोळा किंवा प्लॅस्टिकचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या झाडांवर शेडनेटची सावली करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.