Farmer Complaints on Seeds: खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या पेरणीनंतर उगवण न झाल्याच्या तक्रारींनी वर्धा जिल्ह्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट गडद झाले असून, कृषी विभागाकडे आतापर्यंत तब्बल ३०५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. .विशेष म्हणजे, यापैकी १८१ तक्रारी एकाच कंपनीच्या बियाण्यांबाबत असून, तपासणी समित्यांनी १७० शेतांवरील पाहणीत बियाण्यांतील त्रुटींना दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात कपाशीबरोबरच मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. अल्प कालावधीत उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, यंदा अनेक भागांत पेरणीनंतर बियाण्यांची उगवणच न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढत आहे..Soybean BBF Sowing: सोयाबीनची बीबीएफवर लागवड फायदेशीर! काय आहे बीबीएफ?.तक्रारींची शहानिशा करण्यासाठी वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागांत स्वतंत्र समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी आतापर्यंत १७० शेतांवर प्रत्यक्ष पाहणी केली असून, अनेक प्रकरणांत बियाण्यांतील त्रुटी आढळल्याचा अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे संबंधित कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे अथवा खरेदी किमतीची भरपाई द्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे..यंदा जालणा येथील एका कंपनीच्या बियाण्यांबाबत सर्वाधिक १८१ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. इतर काही कंपन्यांविरोधातही उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, प्रत्येक तक्रारीची शेतावर जाऊन पडताळणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ज्या कंपन्यांविरोधात तक्रारी होत्या, त्यांच्याबाबत यंदा तक्रारी आलेल्या नाहीत. यंदा नव्या कंपनीच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसल्याचे चित्र आहे..Quality Seeds: बी-बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी?.दरम्यान, बियाणे विक्रीच्या काळात गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होती का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. केवळ बियाण्यांची किंमत परत मिळून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नसून, दुबार पेरणी, मजुरी आणि वेळेचे नुकसानही विचारात घ्यावे, अशी मागणी होत आहे..बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी विविध भागांतून प्राप्त होत आहेत. त्यासाठी स्थापन केलेल्या तीन समित्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. अहवालाच्या आधारे संबंधित कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या बियाण्यांबाबत तक्रारी आहेत, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे.अरविंद उपरीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.