Pomegranate Market : परराज्यांतील डाळिंबांना पसंती

Pomegranates Market : थंडीत डाळिंबाचे पीक मोठ्या प्रमाणात येत असल्याने राज्यात तसेच परराज्यातदेखील डाळिंबाला मोठी मागणी असते.
Pomegranates
PomegranatesAgrowon
Published on
Updated on

Vashi News : थंडीत डाळिंबाचे पीक मोठ्या प्रमाणात येत असल्याने राज्यात तसेच परराज्यातदेखील डाळिंबाला मोठी मागणी असते. अशातच नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटक, गुजरात, राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात डाळिंबांची आवक होत असल्याने किमतीत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या मालापैकी जवळपास ५० ते ६० टक्के माल हा परराज्यातून येत असतो. अशातच मोसमाच्या सुरुवातीला डाळिंबाला २०० ते २५० रुपयांचा दर किलोला मिळत होता. पण आता परराज्यातील डाळिंबामुळे हाच दर ६० ते ११० रुपये प्रतिकिलोवर आला आहे.

Pomegranates
Pomegranate Market : डाळिंब उत्पादकांचा पाय आणखी खोलात

महत्त्वाचे म्हणजे, सोलापूर भागात उत्पादित डाळिंब प्रामुख्याने दिल्ली बाजारात जात असल्याने गुजरात, राजस्थानमधील डाळिंबाने राज्‍यातील बाजारपेठेत शिरकाव केला आहे.

Pomegranates
Pomegranate Market : परराज्यातील आवकेमुळे महाराष्ट्राच्या डाळिंबास दराचा झटका
गुजरात आणि राजस्थानचा माल बाजारात वाढल्यामुळे डाळिंबाचे भाव पडले आहेत. राज्यातील डाळिंबाची किंमत प्रतिकिलो १०० ते १५० रुपये इतकी होती. मात्र, आता ती कमी होऊन ६० ते ११० रुपयांपर्यंत आली आहे. गुजरात आणि राजस्थानचा माल आला नसता, तर महाराष्ट्राच्या डाळिंबाची किंमत २०० प्रतिकिलोपर्यंत झाली असती.
आलम शेख, व्यापारी

आरोग्याच्या दृष्टीने फायदे

डाळिंबाच्या रसात १० ते १६ टक्‍के साखरेचे प्रमाण असते. ही साखर पचनास हलकी असते. कुष्ठरोगावर हा रस गुणकारी आहे. त्‍याचप्रमाणे फळांची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे. कापड रंगवण्‍यासाठीसुद्धा फळांच्‍या सालीचा उपयोग केला जातो.

त्यामुळे डाळिंबाचे फायदे लक्षात घेता या फळाला अधिक मागणी असल्याचे दिसून येते. सांगोला, सोलापूर या ठिकाणांहून डाळिंब मोठ्या प्रमाणात येत असून गुजरात, राजस्थानच्या मालात आणि महाराष्ट्राच्या मालात फरक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com