
Nashsik News : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो लिलावाचा प्रारंभ सोमवारी (ता.२१) रोजी बाजार समितीचे उपसभापती संदीप दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव व सिन्नरसह अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उत्पादित डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो शेतकरी विक्रीसाठी आणतात.
मालविक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या १० ते ११ वर्षांपासून डाळिंब, मागील वर्षीपासून ड्रॅगन फ्रूट व ३० वर्षांपासून टोमॅटो लिलाव येथे होतात. त्यानुसार बाजार समितीचे उपसभापती संदीप दरेकर उपस्थित बाजार समिती सदस्य, शेतकरी, अडते व व्यापारी यांच्या हस्ते डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो क्रेटचे पूजन करून लिलावाचा प्रारंभ करण्यात आला.
मुहूर्तावर गोंदेगाव (ता. निफाड) येथील शेतकरी भाऊसाहेब साळवे यांचा डाळिंब प्रति क्रेट ३७०० दराने गुलजार फ्रूट ॲन्ड व्हेजिटेबल कंपनी यांनी खरेदी केला. तसेच गोंदेगाव (ता. निफाड) येथील शेतकरी बालाजी साळवे यांचा ड्रॅगन फ्रूट शेतीमाल प्रति क्रेट २१०० रुपये दराने गुलजार फ्रूट ॲन्ड व्हेजिटेबल कंपनी यांनी खरेदी केला. त्याचप्रमाणे शिवापूर, (ता.निफाड) येथील शेतकरी विक्रम जगताप यांचा टोमॅटो हा शेतीमाल प्रती क्रेट २,५०० रुपये दराने शिवशंभू ट्रेडर्स यांनी खरेदी केला. \
या प्रसंगी दरेकर म्हणाले, की शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावे म्हणून डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो खरेदीदार/निर्यातदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्यावर बाजार समितीचा भर राहणार असून शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेचच रोख पेमेंट देण्यात येणार आहे.
तसेच डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो लिलावात नव्याने सहभागी होऊ इच्छुक खरेदीदार/निर्यातदार व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तत्काळ परवाना देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीमाल २० किलोच्या क्रेटसमध्ये विक्रीस आणावा असे आवाहन सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले. या प्रसंगी बाजार समितीचे सदस्य भीमराज काळे, छबूराव जाधव, सुवर्णा जगताप, प्रवीण कदम, रमेश पालवे, सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, पंकज होळकर, प्रभारी हिरालाल सोनारे व संजय होळकर, सागर कुऱ्हाडे, गणेश आहेर, संदीप शेलार, हर्षवर्धन होनराव, लाला ठाकरे, दिपक जेऊघाले, कृष्णा जगताप, सागर सोनवणे, सुशील जोशी यांसह डाळिंब व टोमॅटो व्यापारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुहूर्ताला मिळालेले दर असे...
शेतीमाल आवक (क्रेट) किमान कमाल सरासरी
डाळिंब १३५ १०० ३,७०० २५,०००
ड्रॅगन फ्रूट २५ १०० २,१०० १,९००
टोमॅटो ५४५ ५०० २,५०० १,५००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.