हेमंत जगतापCrop Productivity: पॉलिफिल्ममुळे सूर्यप्रकाशाचा आवश्यक भाग पिकांपर्यंत पोहोचतो तसेच पाऊस, वारा आणि इतर वातावरणीय घटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यास मदत होते. पॉलिफिल्मची निवड करताना फिल्मचा रंग किंवा जाडी एवढाच निकष न ठेवता प्रकाश परिवर्तन, प्रकाश विकिरण, युव्ही स्टॅबिलायझेशन, थर्मल प्रभाव,धूळ रोधक, सल्फर रोधकतसेच यांत्रिक मजबुती आणि अपेक्षित आयुष्य यांचा विचार करणे आवश्यक आहे. कारण वेगवेगळ्या पिकांना व हवामानाला वेगवेगळ्या प्रकारची प्रकाश व तापमान परिस्थिती आवश्यक असते. त्यामुळे योग्य पिकासाठी, योग्य हवामानात, योग्य गुणधर्मांची पॉलिफिल्म निवडणे हे पॉलिहाउसच्या उत्पादनक्षमता, पिकांची गुणवत्ता, फिल्मचे आयुष्य आणि एकूण आर्थिक कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे..पॉलिफिल्मचे तांत्रिक गुणधर्मयूव्ही स्टॅबिलायझेशन : अतिनील किरणांमुळे प्लास्टिक खराब होत नाही. यामुळे पॉलिफिल्म ३ ते ५ वर्षे टिकते.प्रकाश विकिरण : सूर्यप्रकाश पॉलिहाउसमध्ये सर्व भागांत समान पसरतो, ज्यामुळे खालील पानांपर्यंत प्रकाशसंश्लेषण व्यवस्थित होते..Polyhouse Management In Monsoon: पावसाळ्यामधील पॉलिहाउसचे व्यवस्थापन.अँटीड्रिप : पॉलिफिल्मच्या आतील बाजूस पाण्याच्या वाफेचे थेंब साचून पिकांवर पाझरत नाहीत. यामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका टळतो.थर्मल प्रभाव : रात्रीच्या वेळी जमिनीतील उष्णता बाहेर पडण्यापासून रोखते, ज्यामुळे आतील तापमान नियंत्रित राहते.धूळ रोधक : बाहेरच्या बाजूला धूळ साचत नाही, ज्यामुळे प्रकाशाची पारदर्शकता कायम राहते..योग्य पॉलिफिल्मपॉलिहाउससाठी योग्य पॉलिफिल्म निवडताना मायक्रॉन (जाडी), जीएसएम (वजन) आणि ब्रँडची गुणवत्ता या तीन प्रमुख गोष्टींचा विचार करणे अत्यंत आवश्यक असते..मायक्रॉनमायक्रॉन म्हणजे पॉलिफिल्मची जाडी. पॉलीहाउसच्या टिकाऊपणासाठी योग्य मायक्रॉनची निवड करणे गरजेचे असते.२०० मायक्रॉनपॉलिहाउससाठी मानक आणि सर्वात उत्तम पर्याय. भारतात ८०-९० टक्के पॉलिहाउसवर २०० मायक्रॉन फिल्मच वापरली जाते. ही ३ ते ५ वर्षे सहजरित्या टिकते..१५० मायक्रॉनतात्पुरत्या स्वरूपाच्या शेडनेट किंवा कमी बजेटच्या स्ट्रक्चरसाठी वापरली जाते. वारंवार वादळ किंवा कडक ऊन असलेल्या भागात ही १ ते २ वर्षांत खराब होऊ शकते.२५०+ मायक्रॉनअतिशय जास्त वारे, बर्फवृष्टी किंवा वादळी प्रदेशात वापरली जाते. ही मजबूत असली तरी प्रकाशाची पारदर्शकता थोडी कमी होऊ शकते..जीएसएमजीएसएम म्हणजे प्रति चौरस मीटर फिल्मचे वजन. जीएसएमवरून फिल्मची घनता व मजबूती समजते.२०० मायक्रॉन पॉलिफिल्मचे वजन: साधारणपणे १९० ते २०५ जीएसएमच्या दरम्यान असते..निवड करताना काळजीखरेदी करताना केवळ मायक्रॉन न बघता जीएसएम तपासावा. फिल्म सर्व ठिकाणी एकाच जाडीची असल्यास जीएसएम सर्वत्र एकसमान राहतो..पॉलिफिल्म बसवताना काळजीयोग्य हवामान, वेळपॉलिफिल्म नेहमी सकाळी नऊच्या आधी किंवा संध्याकाळी पाच नंतर उन्हाची तीव्रता कमी असताना बसवावी.जास्त कडक उन्हात फिल्म ताणल्यास थंड झाल्यावर ती आकुंचन पावून फाटू शकते, तर जास्त थंडीत बसवल्यास उन्हाळ्यात ती सैल पडू शकते..Polyhouse Construction: पॉलिहाउसचा टिकाऊपणा वाढविणारे घटक .स्ट्रक्चरची पूर्वतपासणीफिल्म बसवण्यापूर्वी लोखंडी सांगाड्याच्या गंजलेल्या किंवा टोकदार भागांवर पॉलीप्रोपिलीन टेप किंवा व्हाईट पेंट लावावा, जेणेकरून उष्णतेने फिल्म जळणार नाही किंवा कापली जाणार नाही.जीआय पाइप्सचे सांधे गुळगुळीत असावेत..झिगझॅग स्प्रिंग,ॲल्युमिनियम प्रोफाइलचा वापरफिल्म फिक्स करण्यासाठी ॲल्युमिनियम प्रोफाइल आणि झिगझॅग स्प्रिंगचा वापर करावा.स्प्रिंग टाकताना किंवा काढताना फिल्मला कुठेही कट जाणार नाही याची दक्षता घ्यावी..योग्य ताणपॉलिफिल्म सर्व बाजूंनी एकसमान ताणली गेली पाहिजे. कुठेही खड्डे किंवा सैलपणा राहता कामा नये, अन्यथा तिथे पावसाचे पाणी साचून वजनाने फिल्म फाटू शकते.योग्य बाजू ओळखणेपाच लेअर पॉलिफिल्मवर "This side inside / towards crop" असे छापलेले असते. अँटी-ड्रिप आणि युव्ही लेअर योग्य दिशेने राहण्यासाठी प्रिंट वाचूनच फिल्म अंथरावी..देखभालीदरम्यान काळजीधूळ साचू न देणेपॉलिफिल्मवर धूळ साचल्यास सूर्यप्रकाश आत येण्याचे प्रमाण प्रकाश विकिरण २० ते ३० टक्क्यांनी कमी होते.महिन्यातून किंवा दोन महिन्यांतून एकदा मऊ कापडाने किंवा कमी दाबाच्या पाण्याचा फवारा मारून फिल्म स्वच्छ करावी..रसायन आणि कीटकनाशकांपासून संरक्षणतांबेयुक्त कीटकनाशकांचा थेट पॉलिफिल्मवर संपर्क येऊ देऊ नये. या रसायनांमुळे युव्ही स्टॅबिलायझेशन नष्ट होते आणि फिल्म लवकर कडक होऊन फाटते.लहान भेगा किंवा कट वेळेवर मुजवणेवाऱ्याने किंवा कोणत्याही कारणाने फिल्मला लहान कट पडल्यास त्वरित पॉलिहाउस रिपेअर टेप लावून तो बंद करावा. सामान्य सेलोटेप वापरू नये..पावसाळ्यापूर्वी व वादळाच्या वेळी पूर्वतयारीवादळ किंवा जोराचा वारा येण्यापूर्वी सर्व साइड व्हेंट आणि दरवाजे घट्ट बंद करावेत, जेणेकरून आत हवेचा दाब तयार होऊन छत उडणार नाही.रेन गटर मधील कचरा साफ ठेवावा, जेणेकरून पावसाचे पाणी तुंबणार नाही..योग्य वेळी फिटिंग, केमिकलपासून संरश्रण आणि वेळेवर दुरूस्ती केल्यास २०० मायक्रॉनची पाच लेअर पॉलिफिल्म कोणतीही अडचण न येता सहज पाच वर्षे टिकते.हेमंत जगताप८२७५३७१०८२(वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.