Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मतदान

Maharashtra Election 2024 : ग्रामीण भागात मतदान करूनच शेतीसह अन्य कामास जाण्यासाठी मतदारांनी प्राधान्य दिले. बहुतांशी ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मतदान झाले.
Maharashtra Election
Maharashtra ElectionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्ह्यात दहा विधानसभा मतदार संघांत बुधवारी (ता. २०) चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान झाले होते. थंडीमुळे काही भागात धीम्या गतीने सुरुवात झाली. सकाळी नऊनंतर मतदानाने गती घेतली. ग्रामीण भागात मतदान करूनच शेतीसह अन्य कामास जाण्यासाठी मतदारांनी प्राधान्य दिले.

बहुतांशी ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मतदान झाले. सायंकाळी चार नंतरच्या अंतिम टप्प्यात अनेक ठिकाणी विविध मतदार संघांत रांगा लागल्याचे चित्र होते. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघांत ३ हजार ४५३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

यासाठी १६ हजार २३७ अधिकारी, कर्मचारी ३ हजार ४५२ केंद्रांवर नियुक्त करण्यात आले होते. ८ हजार १५७ पोलिस अधिकारी, होमगार्ड, आदींची नियुक्ती होती. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चंदगडमध्ये ५४.६३ टक्के, राधानगरी ५९.५०, कागल ५८.७१, कोल्हापूर दक्षिण ५१.२०, करवीर ५८.६३, कोल्हापूर उत्तर ४८.३, शाहूवाडीत ६१.७०, हातकणगंले ५०.०१, इचलकरंजी ४५.२८ तर शिरोळमध्ये ५२.६६ टक्के मतदान झाले होते.

Maharashtra Election
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

निवडणुकीत महायुती व महाविकास आघाड्यांमध्येच प्रामुख्याने लढत होत आहे. पहिल्या चार तासांमध्ये २०.५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदार संघांपैकी पहिल्या चार तासांत सर्वाधिक मतदानाची नोंद करवीर मतदार संघामध्ये झाली. करवीरमध्ये सकाळी अकरापर्यंत २६.१३ टक्के मतदानाची नोंद झाली. काँग्रेसचे राहुल पाटील आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) चंद्रदीप नरके यांच्यात थेट लढत होत आहे.

कागलमध्ये २३.६८ टक्के मतदानाची नोंद झाली, तर राधानगरी भुदरगड मतदार संघांमध्ये २३ टक्के मतदान झाले. राधानगरी भुदरगड मतदार संघामध्ये सुद्धा चुरशीची लढत होत असून या ठिकाणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी आमदार केपी पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे.

Maharashtra Election
Maharashtra Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यात उत्साही वातावरणात मतदान

कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्यात चुरस आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्या विरोधात भाजपचे अमल महाडिक रिंगणात आहेत. कागलमध्ये चुरशीशी लढत कायम असून कागलमध्ये सकाळी अकरापर्यंत २३.६८ टक्के मतदानाची नोंद झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) समरजितसिंह घाटगे यांनी बोगस मतदानाचा आरोप केला. कागलमधून हसन मुश्रीफ यांनी आपल्या विजयाचा दावा केला. शिरोळमध्ये विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्यामध्येही चुरशीची लढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com