Ahilyanagar News: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान गुरुवारी (ता. १५) शांततेत पार पडले. अहिल्यानगर शहरातील ७० शाळांमधील ३४५ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. .सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत ४८.४९ टक्के मतदान झाले आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळी साडेदहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे..local Body Election: पुण्यात ३६.९५, पिंपरी चिंचवडमध्ये ४०.९ टक्के साडेतीनपर्यंत मतदान .महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात युती असून, शिवसेना (शिंदे) स्वतंत्र लढत आहे. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी आहे. सुमारे २७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत..local Body Election: पुण्यात ३६.९५, पिंपरी चिंचवडमध्ये ४०.९ टक्के साडेतीनपर्यंत मतदान .ही निवडणूक ६८ जागांसाठी होणार असली, तरी अर्ज माघारीच्या दिवशी पाच उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ६३ जागांसाठी मतदान झाले. शहरात सुमारे तीन लाख सात हजार मतदार आहेत. त्यापैकी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत १ लाख ४८ हजार ८८५ मतदारांनी मतदान केले होते. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. ३४५ मतदान केंद्रांपैकी सात मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली होती..त्यावर प्रशासनाचा वॉच होता. निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी सुमारे दोन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा देखील वॉच राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य पथक, अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणचे कर्मचारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रात्री विजेची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध होत्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.