Mumbai News: महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या राखेच्या वापरासंबंधीच्या धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या राखेच्या वापराबाबतचे धोरण २०१६ मध्ये निश्चित करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सदर धोरणात बदल करणे, प्रस्तावित होते. .त्यानुसार या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणाद्वारे राखेच्या १०० टक्के पर्यावरणपूरक पद्धतीने विनियोग कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. या धोरणाद्वारे विविध घटकांकरिता राख वापरण्यासाठी प्रोत्साहनात्मक सवलती देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत..Cabinet Meeting : श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी १ हजार रुपयांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसाह्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास बुधवारी (ता. ३) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसाह्य दिले जात होते. आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल..राज्यातील संजय गांधी निराधार अनुदानअंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसाह्य दिले जाते. सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ४ लाख, ५० हजार, ७०० आणि श्रावणबाळ योजनेत २४ हजार, ३ दिव्यांग लाभार्थी आहेत. त्यांना अडीच हजार रुपये अर्थसाह्यास मान्यता देण्यात आली. हे अनुदान ऑक्टोबरपासून देण्यात येईल. यासाठी ५७० कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली..Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ९ निर्णय; पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलासा.केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनाराज्यातील अनुसूचित जमातीतील इयत्ता नववी आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी आता केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात येणार आहे..राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जमातीच्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात्त येत आहे. ही योजना व केंद्र सरकारच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेशी तुलना केली असता केंद्राच्या योजनेमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम राज्याच्या योजनेपेक्षा अधिक मिळते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.