Maratha Reservation : पोलिसांनी जरांगेंना दिली नोटीस; जरांगे म्हणाले, 'मेलो तरी मागे हटणार नाही'
Manoj Jarange : सकाळी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. "सरकार कोणत्याही थराला जाऊ दे, मी त्या थराला जायला तयार आहे. मला जेलमध्ये टाकले तरी मी तिकडेही उपोषण करेन. मात्र, आझाद मैदान कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही," अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.