
Dharashiv News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) पहिल्या टप्प्यांत योजनेस राज्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याने या प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला आहे. राज्यातील शेतीचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी राज्य शासनामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन राबविण्यात येणार आहे.
या अंतर्गत जिल्ह्यातील १३८ गावे यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतीचा विकास होत नाही, अधिक उत्पादन व उत्पन्न मिळत नाही, तोपर्यंत राज्याचा विकास झाला, असे म्हणता येत नाही. यामुळेच विविध योजनांसाठी सरकारने पोकरा योजना हाती हाती घेतली आहे.
सुरवातीला काही जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली. योजनेचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने योजनेचा दूसरा टप्पा सुरू केला आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली असून जिल्ह्यातील १३८ गावांचा समावेश झाला आहे. जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या लक्षात घेता पंचवीस टक्के गावांमध्ये योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
सिंचनाचे स्रोत मजबूत होण्यास मदत होणार आहे. योजनेत १२६ सरपंचांना प्रशिक्षण यशदाच्या वतीने लातूरच्या कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर गठित ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून मृद व जलसंधारण कामे तसेच भूजल पूणर्भरनाची कामे व लोकसहभागातून कामाचे नियोजन होणार आहे. यासाठी प्रत्येक गावातून चार स्वयंसेवकांची निवड केली जाणार असून त्यात दोन महिला स्वयंसेवक असणार आहेत. सर्वांना पाणी फाउंडेशनकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
योजनेत तालुकानिहाय समाविष्ट गावे
धाराशिव - गोपाळवाडी, कसबे तडवळा, दुधगाव, खामगाव, खंडाळा, घोगरेवाडी, पळसप, भिकार सारोळा, मोहतरवाडी, पानवाडी, तेर, जहागीरदारवाडी, शिंगोली, उपळा, वरुडा, हिंगळजवाडी, डकवाडी, रामवाडी, कोळेवाडी, वाणेवाडी, इर्ला, भडाचीवाडी, आळणी, कुमाळवाडी.
तुळजापूर - बिजनवाडी, तीर्थ (बु.), चिंचोली,आरळी( खु), बसवंतवाडी, आरळी (बु .), येवती, काळेगाव, दिंडेगाव, हिप्परगा(ताड), धोत्री, शिवाजीनगर, आलियाबाद, रामतीर्थ, येडोळा, खुदावाडी, शहापूर निलेगाव, गुळहळी.
उमरगा - मुळज, तुरोरी, दाबका, आष्टा (ज), पारसखेडा , भिकार सांगवी, दाळींब, काटेवाडी, चिंचोली (भुयार), एकोंडीवाडी , चिंचोली (जहागीर), कसगीवाडी, कसगी, कदेर, भुसणी, बेरडवाडी, नाईकनगर, इंगोलेतांडा, मुरळी, कोथळी, बेळंब.
लोहारा - उदतपूर, तावशीगड, चिंचोली काटे, हराळी, तोरंबा, सालेगाव.
भूम - दुघोडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी, नान्नजवाडी, बागलवाडी, पाथरुड, बेदरवाडी, जयवंतनगर, आंतरगाव, पिडा, इडा, कानडी, राळसांगवी, भवानवाडी(सु.), हिवर्डा, पाटसांगवी, वाल्हा, वालवड, चिंचपूर (ढगे), गणेगाव, सामनगाव, पिंपळगाव, बेलगाव.
परंडा - लोणारवाडी, माणिकनगर, कोकरवाडी, धोत्री, तांदुळवाडी, चिंचपूर बु ,जगदाळवाडी , देऊळगाव, काटेवाडी, बोडखा, दहिटना, भोत्रा, वाणेवाडी, वाकडी, पिंपळवाडी, ब्रम्हगाव, सरणवाडी, आसु, ऐनापूरवाडी.
वाशी - पारगाव, पिंपळगाव (हल), सोनेगाव, सारोळा (वाशी), कावळेवाडी, महालदार पुरी, कडकनाथवाडी, मसोबाची वाडी.
कळंब - कोठाळवाडी, कन्हेरवाडी, मस्सा(ख.), पाडोळी, निपाणी, वडगाव(शि.), बाभळगांव, दहिफळ, शिंगोली, वाघोली, हाळदगांव, सौंदना(ढोकी), सापनाई, चोराखळी, मलकापूर, येरमाळा, दुधाळवाडी, बांगरवाडी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.