Sustainable Farming: राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रमुख पीक पद्धतींमध्ये संवर्धित शेती (Conservation Agriculture) पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने भोपाळ येथील भारतीय मृदा विज्ञान संस्था (IISS), अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये व्यापक संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या संदर्भात मुंबई येथे तीनही कृषी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला..या करारावेळी प्रकल्प संचालिका मिनल करणवाल, कृषी आयुक्त सूरज मांढरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, भारतीय मृदा विज्ञान संस्थेचे डॉ. नरेंद्र कुमार लेंका तसेच प्रकल्पाचे कृषिविद्या व मृद विज्ञान तज्ज्ञ विजय कोळेकर आणि संबंधित विद्यापीठांतील प्रकल्प अधिकारी उपस्थित होते..POCRA Project: ग्रामपातळीवर प्रकल्पांच्या कामांना गती द्या : विजय कोळेकर.जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शून्य मशागत व संवर्धित शेती ही पद्धत जगभरात प्रभावी मानली जाते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शेतीशाळांच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला होता. मात्र, विविध पिकांसाठी विभागनिहाय व स्थळनिहाय संशोधन आवश्यक असल्याने हा नवीन संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प २१ जिल्ह्यांतील ८४ गावांमधील २५२ प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर सहभागी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सहभागामुळे तंत्रज्ञानाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे..PoCRA Project: पोकराअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी २० हजारांवर अर्ज.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार असून, मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ. श्याम जाधव हे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांच्या समवेत डॉ. संजय काकडे (कापूस संशोधन विभाग), डॉ. नितीन पतके कृषी विद्या विभाग), .डॉ. नितीन कोंडे व डॉ. दिलीप नलगे (मृद विज्ञान विभाग), डॉ. अविनाश गजाकोस (कृषी अभियांत्रिकी) आणि डॉ. संदीप लांबे (कृषी विस्तार विभाग) हे सह-शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत राहणार आहेत. या प्रकल्पासाठी कुलगुरू डॉ. गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, अधिष्ठाता डॉ. अरविंद सोनकांबळे, कुलसचिव श्रीमती प्रीती रोडगे आणि नियंत्रक डॉ. हेमंत ठाकरे यांच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.