PM Kisan 19th Installment : नांदेडच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ७७.२५ कोटी जमा

PM Kisan Sanman Nidhi Scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना एकोणिसाव्या हप्त्याचे वितरण सोमवारी (ता. २४) होणार आहे.
Farmer With Money
PM Kisan Scheme Agrowon
Published on
Updated on

Nanded News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना एकोणिसाव्या हप्त्याचे वितरण सोमवारी (ता. २४) होणार आहे. यात नांदेड जिल्ह्यातील तीन लाख ८६ हजार २५७ पात्र लाभार्थ्यांना ७७ कोटी २५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार ४७५ कोटी ८७ लाखांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी बिहार राज्यातील भागलपूर येथे किसान सन्मान समारोह संमेलनाचे आयोजन केले आहे. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

या ऑनलाइन समारंभाचे जिल्हास्तरावर आयोजन कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी (ता. जि. नांदेड) व कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी (ता. बिलोली) येथे तालुका कृषी अधिकारी, बिलोली यांच्या समन्वयाने दुपारी एक ते साडेतीन दरम्यान करण्यात आले आहे.

Farmer With Money
PM Kisan Fraud Link : पीएम किसानच्या बनावट लिंकद्वारे अनेकांची लूट; नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार

यासोबतच तालुकास्तवर व ग्रामपंचायतस्तरावर कृषी, महसूल, आणि ग्रामविकास विभागाच्या समन्वयाने स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, स्थानिक कृषी शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रगतिशील शेतकरी तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समारंभाचे आयोजन केले आहे.

Farmer With Money
PM Kisan Scheme : यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना २३२ कोटींच्या अर्थसाहाय्याचे वितरण

या वेळी अग्रिस्टॅक योजनेविषयी मार्गदर्शन करून उपस्थित शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी करण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन प्रगतिशील तसेच कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या ऑनलाइन समारंभास जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

अठरा हप्त्यांतून १४७५.८७ कोटींचे वितरण

नांदेड जिल्ह्यातील एकूण तीन लाख ८६ हजार २५७ पात्र लाभार्थ्यांना ७७ कोटी २५ लाख रुपये १९ व्या हप्त्यातून अदा करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १८ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत एकूण एक हजार ४७५ कोटी ८७ लाखांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com