NITI Aayog PM Kisan Study: सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे (PM-KISAN) शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि यामुळे शेती उत्पादकता वाढीस मदत मिळाली. तसेच सुमारे ९२ टक्के लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीचा वापर बियाणे, खते, कीडनाशके आदी कृषी निविष्ठांसाठी केला, असा दावा निती आयोगाच्या अभ्यासातून करण्यात आला आहे. याची माहिती केंद्रीय कृषिराज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिली आहे. .निती आयोगाच्या विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालयाने (डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्यूएशन ऑफिस) केलेल्या अभ्यासानुसार, पीएम किसान योजनेमुळे शेतजमीनधारक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा प्रमुख उद्देश यशस्वीपणे साध्य होत आहे. तसेच कृषी उत्पादनाचा वाढता खर्च तसेच हवामानाशी संबंधित अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांसाठी मोठी मदत होत आहे..PM Kisan Installment: राज्याच्या निर्णयाअभावी थकले ‘पीएम किसान’चे दोन हप्ते.पीएम किमान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर कृषिमराज्यमंत्र्यांनी या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला असल्याची माहिती लोकसभेत लेखी उत्तरातून दिली आहे..PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांसाठी ३.१५ लाख कोटींची तरतूद.पीएम किसान ही शेतजमीनधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेली केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते. या योजनेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत सरकारने २३ हप्ते दिले आहेत. या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे ४.४७ लाख कोटी रुपये रक्कम वितरित केली असल्याची माहिती कृषिराज्यमंत्र्यांनी दिली आहे..या योजनेच्या २३ व्या हप्त्यापोटी ९ कोटी ४४ लाख ३४ हजार ६५० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८,८९५ कोटी रुपये वितरित करण्यात आली. यात उत्तर प्रदेशातील २ कोटी १७ लाख आणि महाराष्ट्रातील ९० लाख ५५ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. .पीएम किसानचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी वितरित करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना पीएम किसानच्या २४ व्या हप्ताची प्रतीक्षा लागली आहे. हा हप्ता नेमका कधी जमा होणार? याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.