PM Kisan Beneficiary Farmers: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २४ व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा २ हजार रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सरकारने याबाबत अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. हा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळाला तर शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीसाठी आर्थिक दिलासा मिळू शकतो..पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी जमा करण्यात आला होता. हा हप्ता मिळून चार महिने पूर्ण झाले आहेत. यामुळे २४ वा हप्ता लवकरच वितरित केला जाण्याची शक्यता आहे. पीएम किसान निधी योजनेची सुरुवात मोदी सरकारने २४ फेब्रुवारी २०१९ रोजी केली होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. .Namo Shetkari Installment: 'नमो शेतकरी' योजनेच्या प्रलंबित हप्त्याचे काय झाले? .पीएम किसान हप्त्याबद्दल माहिती कशी पाहावी?पीएम किसान योजनेच्या पोर्टलला (https://pmkisan.gov.in/) भेट द्यावी.त्यावर Know Your Status या पर्याय निवडावा. लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव, नोंदणी क्रमांक आदी माहिती नमूद करावी.त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल.तो नमूद करुन तुमच्या हप्त्याशी संबंधित माहिती मिळेल. .PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती....तर लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो?जर लाभार्थी शेतकऱ्याने ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली नसल्यास त्याला पुढील हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो. लाभार्थ्याची ओळख पटवणे आणि लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायला हवी. तसेच शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आणि आधार संबंधित माहिती अचूक असल्याची खात्री करुन घ्यायला हवी..Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार?पीएम किसान हप्ता मिळाल्यानंतर लगेच दोन दिवसांनी महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. पण नमो शेतकरी निधी योजनेचे दोन हप्ते प्रलंबित आहेत. राज्य सरकारने ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रिम मदत सरकारने जाहीर केली. पण नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते कधी मिळणार? याबाबत कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.