
Talegaon Dhamdhere News: शिरूर तालुक्यासाठी चासकमान धरणातून सोडण्यात येणाऱ्या उन्हाळी आवर्तनाबाबत नेमका कोणता निकष लावण्यात आलेला आहे. याची माहिती त्वरित द्यावी. चासकमान धरणामध्ये शिरूर तालुक्यातील बहुतांश जमिनी पश्चिम पट्ट्यातील गेलेल्या असताना प्राधान्य नेमके कोणाला दिले जाते असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चासकमानचे उन्हाळी आवर्तन त्वरित पश्चिम पट्ट्यातील विविध गावातील चासकमानच्या चाऱ्या व पोट चाऱ्यांना दोन ते तीन दिवसात पाणी सोडावे. अन्यथा लाभार्थी शेतकऱ्यांसमवेत शिक्रापूर येथील पाटबंधारे विभागाच्या चासकमान कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. अनिल भुजबळ यांनी शिक्रापूर येथील पाटबंधारे चासकमान विभागाच्या शाखा अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
भुजबळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, चासकमानचे लाभार्थी शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील आहेत, परंतु पश्चिम भागातील शेतकऱ्यांना नेहमीच चासकमानच्या पाण्याची वाट पहावी लागते तसेच सतत मागणी करावी लागते. नेमके आवर्तन सोडण्याचे निकष काय आहेत याची माहिती संबंधित विभागाने द्यावी. पश्चिम भागातील तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी, दरेकरवाडी, बुरुंजवाडी मुखई, कोंढापुरी, निमगाव म्हाळुंगी, कासारी, गणेगाव, वाघाळे आदी पंचक्रोशीतील गावे येतात.
ही गावे चासकमानच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या कडक उन्हाळ्यामुळे शेतातील उभी पिके जळून चालली आहेत. जनावरे व पशुपक्षांना पिण्याच्या पाण्याची गरज भासू लागली आहे. परिसरातील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. दरम्यान, या संदर्भात चासकमान विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
पाटबंधारे विभागाची जबाबदारी
चासकमानचे उन्हाळी आवर्तन वेळ नदीत सोडून तसेच परिसरातील चाऱ्या व पोट चाऱ्यांना पाणी सोडून पाणीटंचाई दूर करावी. अन्यथा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारे विभागाची असेल. येत्या दोन-तीन दिवसात पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा अनिल भुजबळ यांनी निवेदनात दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.