Plastic Tray Rice Seedling: मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील पाच गावांत तालुका कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत २५ एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी बीजप्रक्रिया करून प्लॅस्टिक ट्रेमध्ये रोपवाटिका तयार केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा भात पुनर्लागवडीवरील खर्चसह मजूर टंचाई व खते औषध फवारणीवरील खर्चातही बचत होणार आहे, तसेच या रोपांमुळे हेक्टरी उत्पादन दहा टनांपर्यंत वाढणार आहे..तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी सहायक संजय कटरे साठेसाई तीन एकर, चिखलगाव तेरा एकर, भालगुडी चार एकर, नांदगाव तीन एकर, होतले दोन एकर असे मिळून एकूण २५ एकर क्षेत्रावर हा प्रयोग राबवत आहेत..Paddy Crop Advisory: भात पीक सल्ला : कोकण विभाग.चिखलगाव येथील प्रगतिशील शेतकरी लहू मारुती फाले यांच्या शेतात तालुका कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आठ एकर क्षेत्रावर भात लागवडीसाठी हा उपक्रम राबविला आहे. बीजप्रक्रिया प्रयोग मागील दोन आठवड्यांपूर्वी केला असून, सुरुवातीला बीज उगवण क्षमता चाचणीनंतर बीजप्रक्रिया करण्यात आली..प्लॅस्टिक ट्रेमधील २१ दिवसांनंतर ट्रेमधील भात रोपे मशिनद्वारे लागवडीसाठी तयार होणार आहेत. पारंपरिक भात लागवडीचे उत्पादन हे हेक्टरी ३५ टन मिळते, तर मशिनद्वारे भात लागवड केल्यास उत्पादनात हेक्टरी पंचेचाळीस टनांपर्यंत जाते..Paddy Farming: उत्तर महाराष्ट्राचे ‘भाताचे आगार’ संकटात.अशी केली बीजप्रक्रिया बीज उगवण क्षमता चाचणी.भात बियाणे हे मिठाच्या पाण्याच्या द्रावणातून काढले. त्यानंतर स्वच्छ पाण्यातून दोन वेळा धुऊन सावलीत वाळवले.प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम बुरशीनाशकाची प्रक्रिया केली. त्यानंतर प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि पीएसबीची बीजप्रक्रिया केली.खत आणि माती मिश्रित प्लॅस्टिक ट्रेमध्ये गांडूळ खत पसरून भात बियाणे पेरणी केली..यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्च कमी होऊन, उत्पादन वाढते असे लक्षात आल्यापासून मशिनद्वारे भात लागवड करत आहे.लहू फाले, प्रगतशील शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.