Rabi Season 2024 : सिन्नरला वीस हजार हेक्टर रब्बीचे नियोजन

Rabi sowing : गेल्या वर्षापासून तालुक्यात पर्जन्यमान समाधानकारक असल्याने लागवडीखालील क्षेत्रात निश्चितच वाढ झाली आहे.
Kolhapur Rabi Season
Kolhapur Rabi Seasonagrowon
Published on
Updated on

Nashik News : तालुक्यात परतीचा पाऊस थांबल्यानंतर तालुक्यासह शहरी भागात रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. या वर्षी कृषी विभागाचे सुमारे २०६७४.८८ हेक्टर रब्बी पेरणीसाठी नियोजन असून, आतापर्यंत केवळ एक हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, गहू, मका व हरभऱ्याची पेरणी झाली आहे. खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, त्यानंतर पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाकडून दर वर्षी खरीप आणि रब्बी हंगामनिहाय पेरणी लक्षांक निश्चित करण्यात येतो. गेल्या वर्षापासून तालुक्यात पर्जन्यमान समाधानकारक असल्याने लागवडीखालील क्षेत्रात निश्चितच वाढ झाली आहे.

या वर्षी गहू, हरभरा, कांदा यांसाठी वाढ होणार असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. सुमारे २०६७४.८८ हेक्टरचा अंदाज असून, यामध्ये आतापर्यंत एक हजार ३५७ पेरणी लागवड झाली आहे.

Kolhapur Rabi Season
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला गती

तालुक्यात जलसाठे भरले आहेत. रब्बीच्या अखेरपर्यंत विहिरींची जलपातळी टिकून राहण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. कांद्याची लागवड करण्याकडे कल वाढला आहे.

तसेच देव नदीच्या पूरचारीमुळे रब्बीखालील क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच गहू, हरभरा, तसेच कांद्याची लागवड, भाजीपाल्यामध्ये काकडी, टोमॅटो करण्याकडे कल वाढला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी, व संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Kolhapur Rabi Season
Rabi Sowing : मराठवाड्यात ६ लाख ८१ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

यंदा देव नदीच्या व पूरचारीमुळे परिसरातील विहीर, नदी, नाले, धरण यामध्ये पाणी असल्याने रब्बी पिकांत वाढ होईल. देवपूर, वडांगळी, मेंढी, फरदापूर, सोमठाणे, पंचाळे, शहा, पांढुर्ली, सोनांबे, ठाणगाव, पाडळी, डुबेरे, चास, कासारवाडी, दापूर, वडगाव पिंगळा, चिंचोली, नायगाव, जायगाव, जोगलटेंभी आदी गावांमध्ये रब्बीचे क्षेत्र वाढणार असून, परिसरात शेतकऱ्यांनी केवळ जनावरांसाठी चारा म्हणून मका व ज्वारीची पेरणी केली.

तालुक्यातील हेक्टर पेरणी

पीक सरासरी क्षेत्र हे. एकूण तालुका पेरणी क्षेत्र हे.

ज्वारी रब्बी २७८७.३८ ७२७

गहू ९२७६.५२ ११३

मका २३८६.१२ २७२

एकूण १४४५०.०२ १११२

हरभरा ६२२४.८६ २४५

एकूण ६२२४.८६ २४५

एकूण अन्नधान्य २०६७४.८८ १३५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com