Flood Affected Sugarcane : पूर बाधित ऊस तोडणीचे नियोजन करा; गोकुळचे संचालक नरके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Flood Affected Sugarcane : कोल्हापूर जिल्ह्यात ४० हजार हेक्टरवरील उसाचे महापुरात नुकसान झाले. यामुळे पूरबाधित उसाच्या तोडणीचे वेळापत्रक करण्याची गरज असल्याचे मत चेतन नरके यांनी मांडले.
Gokul Milk Director Chetan Narake
Gokul Milk Director Chetan Narakeagrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर उसापैकी ४० हजार हेक्टरवरील उसाचे महापुरात नुकसान झाले. यामुळे पूरबाधित उसाच्या तोडणीचे वेळापत्रक करण्याची गरज आहे. चांगला आणि पूर बाधित असा निम्मा-निम्मा ऊस तोडण्यात यावा, प्राधान्याने पूर बाधित ऊस तोडणीचे नियोजन करावे अशा आशयाचे निवेदन इंडियन डेअरी असोसिएशन सदस्य व गोकुळ संचालक डॉ. चेतन नरके यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मंगळवारी (ता.०८) दिले.

निवेदनात डॉ. नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात पुराने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पूरबाधित ऊस तोडणीकडे कारखानदारांचा कानाडोळा होवू शकतो. यासाठी पूरबाधित उसाची तोडणीचे वेळापत्रक करण्याची गरज आहे. तसेच महापुरामुळे अर्थकारण बिघडले असताना शेतातील उभे पिक गेल्याशिवाय नवीन पिकाची लागवड होणार नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. तरी याबाबत सकारात्मक विचार करावा असे मत नरके यांनी मांडले.

जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर उसापैकी बहूतांश ऊस दहा ते पंधरा दिवस महापुराखाली होता. कारखान्यांना २०२१ साली ज्या पद्धतीने महापुरातील उसाची तोडणी केली तसेच वेळापत्रक तयार करावे. २०२१ साली साखरेचा उतारा कायम रहावा, ऊस तोडणी टोळ्यांना आर्थिक फटका बसू नये, यासाठी चक्राकार (रोटेशन) पध्दतीने पूरबाधित उस गाळपाचे नियोजन करण्याचे ठरले होते. पूरबाधित व चांगला ऊस ५०-५० टक्के प्रमाणात तोडणी आणि गाळपाचे नियोजन करावे लागणार असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.

Gokul Milk Director Chetan Narake
Animal Market Kolhapur : कोल्हापूरच्या जनावर बाजारात ३ कोटींची उलाढाल; खिलार बैलजोड ९ लाखांना विक्री

मागील महापूरावेळी पूरबाधित उसतोडणीसाठी झालेल्या चुका टाळून नव्याने योग्य नियोजन करावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने आतापासून ठोस उपाययोजना आणि नियमावली करावी लागेल. कारखानदारांनी वेळापत्रक तयार करुन साखर सहसंचालकांना सादर करुन काठेकोर नियोजन झाले तरच पूरबाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याची माहिती डॉ. नरके यांनी दिली.

नदी काठावरील खराब झालेला ऊस शेतातच उभा राहिला तर शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. सध्याचे पाऊस आणि उष्म वातावणामुळे शेतात मोठ्या प्रमाणात तण उगवले आहे. पूरबाधित ऊस काढून मशागतीसह इतर कामे उरकून नवीन पिक कधी घ्यायचे? यातून आर्थिक नुकसान होणार असल्याने शासनाने याची दखल घ्यावी असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com