Climate Impact: फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा परिसरात गुरुवार (ता. १९) रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्यांसह गारपीट व जोरदार पावसाला सुरुवात झाली. .सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या अवकाळी पावसाने परिसरातील आडगाव खुर्द, रांजणगाव,टाकळी कोलते, शेलगाव, आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला..Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात गारपिटीचा साडेअकरा हजार हेक्टरवर फटका.या अवकाळी पावसामुळे काढणीसाठी आलेला गहू, हरभरा तसेच कांदा पिकांवर गारांचा व पावसाचा जोरदार मारा झाला. शिवाय बाजरीचे पीक सुद्धा आडवे झाले.अनेक शेतांमध्ये पिके पूर्णपणे भिजून गेली असून, काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने उभ्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. .Hailstorm Crop Damage: अक्कलकोटला वादळी वारा अन् गारपिटीचा तडाका.अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. गहू व हरभरा सोंगून ठेवलेले पिके झाकण्यासाठी शेतकरी कसरत करताना दिसून आले. वादळी वाऱ्यामुळे गावरान आंब्यांच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले. .कच्चे आंबे मोठ्या प्रमाणावर खाली पडले. ग्राममहसूल अधिकारी गणेश गोरे, सहायक कृषी अधिकारी अनंत साळुंके, ग्रामपंचायत अधिकारी संदीप हनवते यांनी नुकसानीची पाहणी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.