Agriculture Research : ‘बायोडिग्रेडेबल सेंसर फॉर एनव्हायराँमेंटल मॉनिटरिंग’ ला पेटंट ; पिंपळगाव महाविद्यालयाचे प्रा. संपत खैरनार यांचे यश

Biodegradable Sensor for Environmental Monitoring : मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज शिक्षणसंस्था, नाशिक संचलित पिंपळगाव (ब.) येथील क. का. वाघ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राणिशास्र विभागप्रमुख प्रा. संपत रामभाऊ खैरनार यांनी दाखल केलेल्या ‘बायोडिग्रेडेबल सेंसर फॉर एनव्हायराँमेंटल मॉनिटरिंग’ या संशोधनास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाइनच्या नोंदणीचे प्रमाणपत्र देत मंजुरी देण्यात आली.
Research on Biodegradable Sensor for Environmental Monitoring
Research on Biodegradable Sensor for Environmental MonitoringAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज शिक्षणसंस्था, नाशिक संचलित पिंपळगाव (ब.) येथील क. का. वाघ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राणिशास्र विभागप्रमुख प्रा. संपत रामभाऊ खैरनार यांनी दाखल केलेल्या ‘बायोडिग्रेडेबल सेंसर फॉर एनव्हायराँमेंटल मॉनिटरिंग’ या संशोधनास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाइनच्या नोंदणीचे प्रमाणपत्र देत मंजुरी देण्यात आली. या संशोधनामुळे पर्यावरणाचे निरीक्षण करण्यासाठी वापरली जाणारी साधने आणि तंत्रे यांच्यात भर पडणार आहे.

प्रा. खैरनार यांना या संशोधनासाठी मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज शिक्षणसंस्थेच्या सिडको महाविद्यालयातील प्राणिशास्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. रविंद्रकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. खैरनार यांचे सध्या ‘नांदूर-मध्यमेश्वर राष्ट्रीय पक्षी अभयारण्यातील जल-पक्ष्यांची विविधता व तेथील परिस्थितीचा अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पदवीकरिता संशोधन कार्य सुरू आहे.

Research on Biodegradable Sensor for Environmental Monitoring
Agriculture Technology : बहुपयोगी शेती संयंत्राला मिळाले पेटंट

संशोधनाच्या या यशाबद्दल त्यांचे ‘मविप्र’ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस अॕड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, ‘मविप्र’ निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालिका शोभा बोरस्ते, ‘मविप्र’ समाजाच्या सर्व तालुक्यांचे संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, डॉ. विलास देशमुख, डॉ. अजित मोरे,

Research on Biodegradable Sensor for Environmental Monitoring
Agri Expo 2025 : बारामती केव्हीकेच्या ‘एआय’ शेतीबाबत शेतकऱ्यांत उत्सुकता

स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र मोरे, सुनील पाटील, पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राणिशास्र विभागप्रमुख डॉ. विक्रम काकुळते, महाविद्यालयातील सर्व सहकारी, विभागप्रमुख, पत्नी प्रा. सुनीता बोरडे-खैरनार, प्रा. स्वप्नील केंदळे, प्रा. स्नेहल कतवारे, प्रा. संदीप काळे, प्रा. पुजा तिडके आदींनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

पर्यावरणीय मापदंड स्थापित करणे शक्य
पर्यावरण निरीक्षण प्रणालीमधे वापरली जाणारी साधने, त्यांची सद्यःपरिस्थिती, स्पॉट ट्रेंड आणि बदल मोजण्यासाठी हवा, माती आणि पाण्याचा सखोल अभ्यास करण्यासह अंदाज लावता जातो. जोखीम चेतावणी देण्यासह वापरकर्त्यांना टिकाऊपणा आणि पर्यावरणावर माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते. या प्रक्रियेतून पर्यावरणाच्या गुणवत्तेचे वैशिष्ट्य आणि पर्यावरणीय मापदंड स्थापित केली जातात. यांसह पर्यावरणसंबंधित अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यासासाठी मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com