डॉ. वैभव मालुंजकर, डॉ. पवन कुलवाल, डॉ. आनंद बडे‘फुले स्मार्ट पीडीएम’ ॲपची रचना सुलभ आणि द्विभाषिक (मराठी-इंग्रजी) आहे. यामध्ये तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी पिके, भाजीपाला आणि फळपिकांचा समावेश आहे. एकूण ४१ प्रमुख पिकांवरील कीड,रोगांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यासोबत कीटकनाशके, बुरशीनाशके आणि त्यांची व्यापारी नावांचा सविस्तर तपशील दिला आहे. .हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतीसमोरील आव्हाने वाढत चालली आहेत. विशेषतः कीड आणि रोग हे पिकांच्या उत्पादनात व गुणवत्तेत घट आणणारे प्रमुख घटक ठरत आहेत. पिकावर येणाऱ्या कीड, रोगांची वेळेवर आणि अचूक ओळख न झाल्याने शेतकऱ्यांना योग्य उपाययोजना करता येत नाहीत, परिणामी रासायनिक कीडनाशकांचा अनियंत्रित वापर, खर्चात वाढ तसेच पर्यावरणावरही दुष्परिणाम होत आहे..Phule Smart PDM App: शेतकऱ्यांना मिळणार कीडरोगांची अचूक माहिती मोबाईलवर.आजच्या डिजिटल युगात मोबाईल तंत्रज्ञानाने शेती व्यवस्थापनासाठी नवे दालन उघडले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, मृदा, बाजारभाव, तसेच पीक संरक्षणाची माहिती त्वरित मिळू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पीकसंरक्षणासाठी संशोधनाधारित डिजिटल उपाय विकसित केला आहे. तज्ज्ञांनी फुले स्मार्ट कीड व रोग व्यवस्थापन (फुले स्मार्ट पीडीएम) हे मोबाइल ॲप्लिकेशन विकसित केले आहे..ॲपचे वैशिष्ट्ये ४१ प्रमुख पिकांचा समावेश ः तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी, भाजीपाला व फळ पिके.प्रत्येक पिकासाठी कीड-रोगांची फोटोंसह माहिती, स्थानिक तसेच शास्त्रीय नावे.नियंत्रणासाठी रासायनिक व जैविक उपायांची माहिती.कीटकनाशके, बुरशीनाशके आणि त्यांची व्यापारी नावे. शेतकऱ्यांना बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या कीडनाशकांची माहिती.भाषेची सुलभता ः मराठी आवृत्तीमुळे शेतकरी सहज वापर करू शकतात..Mahatma Phule Agricultural University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या यंत्रांना पेटंट.संशोधनाधारित व अधिकृत शिफारशी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ व केंद्रीय कीडनाशक मंडळ (CIB) यांच्या अद्ययावत शिफारसींवर आधारित माहिती.तज्ज्ञांची विश्वासार्ह माहिती: विद्यापीठीय तज्ज्ञांनी तपासलेले आणि संशोधनाधारित मार्गदर्शन.इंटरनेटशिवायही वापरता येणारे ॲप..ॲपच्या माध्यमातून “डिजिटल पीकसंरक्षण” ही संकल्पना प्रत्यक्षात येते. म्हणजेच शेतकऱ्यांना कीड, रोग ओळख, कीडनाशकांच्या शिफारशी आणि व्यवस्थापन तंत्रे एकाच ठिकाणी मोबाइलवर उपलब्ध होतात. हे ॲप शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक, कृषी सेवक आणि उद्योजकांसाठीही उपयुक्त आहे. .ही ॲप आवृत्ती शेतकऱ्यांना मूलभूत आणि सर्वसाधारण कीड-रोग ओळख आणि नियंत्रणाविषयी माहिती देते. या ॲपमध्ये समाविष्ट माहिती फक्त त्या कीड-रोगांवर आधारित आहे ज्यांचा अभ्यास आणि शिफारशी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वैज्ञानिकदृष्ट्या दिलेल्या आहेत. विद्यापीठ सध्या ॲपमध्ये सुधारणा आणि अधिक प्रगत आवृत्ती तयार करत आहे. नव्या आवृत्तीत नवीन पिकांची भर, रोगनिदानासाठी प्रगत तंत्रज्ञान, तसेच शेतकऱ्यांना मोबाइलवरून थेट विद्यापीठातील तज्ज्ञांशी संपर्क साधून कीड व रोगांसंबंधी शंका निवारण करण्याची सुविधा समाविष्ट करण्यात येणार आहे..तंत्रज्ञानाचे फायदे हे ॲप शेतकऱ्यांना कीड व रोगांचे फोटोसह सोपे निदान करण्यास मदत करते. त्यावर आधारित शास्त्रीय शिफारसी त्वरित देते. म्हणजेच शेतकरी शेतात प्रत्यक्ष मोबाईलवरूनच योग्य कीड किंवा रोग ओळखू शकतो, त्यावर योग्य उपाय पाहू शकतो आणि कोणते कीडनाशक खरेदी करायचे हे तातडीने ठरवू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याने हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव ओळखला तर ॲपमधील हरभरा या विभागात जाऊन त्याला अळीचा फोटो, नियंत्रणासाठी लागणारी कीटकनाशके त्यांचे प्रमाण याबाबत माहिती मिळते. त्यामुळे योग्य कीडनाशक फवारणी केली जाते, खर्चात बचत होते..ॲपची रचना सुलभ आणि द्विभाषिक (मराठी-इंग्रजी) आहे. यामध्ये तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, नगदी पिके, भाजीपाला आणि फळपिकांचा समावेश आहे. एकूण ४१ प्रमुख पिकांवरील कीड,रोगांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यासोबत कीटकनाशके, बुरशीनाशके आणि त्यांची व्यापारी नावे यांचा सविस्तर तपशीलही दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि केंद्रीय कीटकनाशक मंडळ (CIB) यांच्या अधिकृत शिफारशींवर आधारित आहे. “फुले स्मार्ट कीड व रोग व्यवस्थापन (Phule SmartPDM)” हे ॲप मोफतपणे Android Play Store वरून डाउनलोड करता येते.- डॉ. सुनील कदम ( विभाग प्रमुख) ९४०३६०८३०२ - डॉ. वैभव मालुंजकर ९५९५१९३३८८(कृषी अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.