IPM System : कीटकनाशके व्यवस्थापन प्रणाली लागू होणार

केंद्रीय सचिवांची शिष्टमंडळाला माहिती
 IPM System
IPM SystemAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणालीच्या (आयएफएमएस) धर्तीवर कीटकनाशकांच्या पुरवठ्याबाबत स्वतंत्र प्रणाली (Integrated Pesticides Management System) तयार करण्याचे संकेत केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिले आहेत.


केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांनी ‘अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन’च्या (Agro Input Dealers Association) शिष्टमंडळाशी चर्चा करताना नव्या एकात्मिक कीटकनाशके व्यवस्थापन प्रणालीचे (आयपीएमएस) संकेत दिले. ‘या संकल्पनेवर कृषी मंत्रालय काम करीत आहे.

त्याविषयी निविष्ठा विक्रेत्यांचे काय मत आहे, असे श्री.आहुजा यांनी विचारले. त्यावर, “आयएफएमएस प्रणाली यापूर्वीच केंद्राने लागू केली. त्यामुळे रासायनिक खतांच्या पुरवठा व विक्रीत सुसूत्रता आली आहे.

त्यामुळे अशी प्रणाली कीटकनाशकांसाठी देखील लागू झाल्यास देशभर त्याचे फायदे होतील. या संकल्पनेला निविष्ठा विक्रेत्यांचा पाठिंबा असेल,” असे शिष्टमंडळाने चर्चेत सांगितले.

 IPM System
अनुदान वितरणासाठीची नवी प्रणाली सर्वत्र लागू

कीटकनाशकांची निर्मिती, पुरवठा, विक्री आणि वापर याच्यावर संनियंत्रण ठेवणारी कोणतीही प्रणाली सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे कोणत्या कीटकनाशकांचा कुठे पुरवठा होतो आहे व त्याचा वापर कसा होतो आहे, याचा अंदाज कृषी विभागाला घेता येत नाही.

बनावट कीटकनाशके विकणाऱ्या टोळ्यादेखील विविध राज्यांत कार्यरत आहेत. त्यामुळे दर्जेदार कीटकनाशके निर्मिती करणारे नामांकित उद्योग आणि शेतकरी या दोन्ही घटकांचे अतोनात नुकसान होते आहे.

तसेच बनावट कीटकनाशकाचा साठा पकडला गेल्यास निविष्ठा विक्रेत्यालाही अकारण कारवाईला सामोरे जावे लागते.

 IPM System
Soya Oil Import : सोयाबीन तेल आयातीवर शुल्क लागू होणार

एकात्मिक कीटकनाशके व्यवस्थापन प्रणाली लागू झाल्यास कीटकनाशके पुरवठा क्षेत्रातील गैरकृत्य करणारे घटक खड्यासारखे बाजूला फेकले जातील.

तसेच कीटकनाशके निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून झालेला पुरवठा ते शेतकऱ्यांपर्यंत झालेली विक्री, याचा तुकडी क्रमांकनिहाय (बॅच नंबर) मागोवा घेणे शक्य होईल.

दर्जेदार मालाचा पुरवठा वाढून शेतकऱ्यांची फसवणूक टळेल. खतांसाठी केंद्र शासनाने आयएफएमएस प्रणाली लागू केली आहे. यामुळे विक्रेत्यांना खतांच्या विक्रीप्रमाणे प्रत्यक्ष वेळेत (रियल टाइम बुकिंग) नोंदणी येते.

या प्रणालीला प्रत्येक शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचा देखील विचार कृषी खाते करीत आहे.

मानवी तसेच पशुपक्ष्यांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व औषधांची नोंद सध्या प्रणालीत होते. मेडिकल स्टोअरमधून विकली जाणारी औषधांची एक गोळीदेखील नोंदवली जाते.

त्याचप्रमाणे कीटकनाशकांच्या विक्रीची नोंद झाल्यास शेतकऱ्यांसह सर्व घटक यंत्रणांची सोय होईल. खतांमध्ये ही प्रणाली यशस्वी झालेली आहे.
- दिलीप झेंडे, संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, कृषी आयुक्तालय

देशातील प्रत्येक शेतकऱ्याला गुणवत्तापूर्ण कीटकनाशकांचा पुरवठा झाला पाहिजे. एकात्मिक कीटकनाशके व्यवस्थापन प्रणाली लागू झाल्यास शेतकऱ्यांना आधार मिळेल.

त्यामुळे या प्रणालीच्या अंमलबजावणीस देशातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांचा पाठिंबा राहील.
- मनमोहन कलंत्री, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com