Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर येथील केसर आंबा गुणवत्ता केंद्रास लिंबूवर्गीय गुणवत्ता केंद्राचे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन यांनी नुकतीच भेट देऊन यंदा आंब्याची मोहर स्थिती जाणून घेतली..नागपूरच्या लिंबूवर्गीय गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. विनोद राऊत, सीट्रस इस्टेटचे (पैठण) मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कारले, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार आदींनी नुकतीच केसर आंबा गुणवत्ता केंद्रास भेट दिली. .Kesar Mango Farming : लवकरच केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे बळकटीकरण.यावेळी हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे तसेच केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील म्हणाले, की सध्याची वातावरणाची परिस्थिती लक्षात घेता थंडीमुळे मराठवाड्यातील सर्वच केसर आंबा बागा एकाचवेळी फुलू लागल्यामुळे आंबा बागायतदारांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. .Kesar Mango Management: केसर आंबा बागेतील पालवी, मोहराचे व्यवस्थापन.यावर्षी लांबलेल्या पावसाचा आंबा बागांना चांगला फायदा झाला आहे. एकाचवेळी सर्व बागांना मोहर येत असल्याने पुनर्मोहराची शक्यता नाही. त्यामुळे फळगळदेखील कमी होण्यास मदत होणार आहे..केसर आंबा रोपवाटिकेतील कलमे आणि स्वयंचलित खत-पाणी व्यवस्थापन यंत्रणा. विविध अंतरावरील आंबा बाग,पुनरुज्जीवित केसर बाग पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कृषी सहायक अनिल बखळे, मन्मथ तोडकर, दिनेश घुगे, शेख अफरोज आदींची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.